Air India च्या विमानाला आग,14 प्रवासी जखमी

Air Indiaच्या विमानाला आग लागल्याची घटना बुधवारी घडली आहे. मस्कत येथे ही घटना घडली आहे. अचानक लागलेल्या या आगीनंतर विमानातील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 14 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

14 प्रवासी जखमी

एअर इंडिया एक्सप्रेसचे IX442,VTAXZ हे विमान मस्कतहून कोचीसाठी रवाना होणार होते. पण उड्डाणापूर्वी काही तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या इंजिन नंबर 2 मध्ये अचानक आग लागल्याने त्यातून अचानक धूर येऊ लागला. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि त्यामुळे प्रवाशांनी पळापळ करायला सुरुवात केली. यावेळी चेंगराचेंगरी होऊन 14 प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही आपला प्राण गमवावा लागला नाही. विमानतळ प्रशासनाने सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर आगीच्या कारणांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

(हेही वाचाः अहमदाबादमध्ये लिफ्ट कोसळून सात जणांचा मृत्यू)

सर्व प्रवासी सुखरुप

ही दुर्घटना घडली त्यावेळी विमानात 141 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स उपस्थित होते. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी विमानतळ प्रशासनाकडून स्लायडर्सचा वापर करण्यात आला. दरम्यान या विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असून त्यांच्यासाठी रिलीफ फ्लाईटची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती DGCA कडून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here