एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची हवाई दलाचे प्रमुख (Air Force Chief) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 30 सप्टेंबर 2024 पासून ते पुढील एअर चीफ मार्शल म्हणून पदभार स्वीकारतील. सध्याचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी (Air Force Chief Air Chief Marshal Vivek Ram Chaudhary) 30 सप्टेंबर 2024 रोजी पदावरून निवृत्त होणार आहेत. (Air Marshal Amar Preet Singh)
एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1964 रोजी झाला. या मोठ्या जबाबदारीपूर्वी, एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी भारतीय हवाई दलाचे 47 वे उपप्रमुख पद स्वीकारले होते. गेल्या काही दिवसांपासून नव्या हवाई दल प्रमुखासाठी अमर प्रीत सिंग यांच्या नावाची चर्चा सुरू होती.
38 वर्षांपासून हवाई दलात कार्यरत
एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांनी आपल्या सेवेत अनेक मोठे यश संपादन केले आहे. 21 डिसेंबर 1984 रोजी डुंडीगल येथील वायुसेना अकादमीमधून (Air Force Academy) ते भारतीय हवाई दलाच्या फायटर स्ट्रीममध्ये नियुक्त झाले. ते 38 वर्षांपासून हवाई दलात सेवा करत आहेत. एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांनी नॅशनल डिफेन्स अकादमी (Khadakwasla NDA) खडकवासला आणि एअर फोर्स अकादमी डुंडीगल येथून प्रशिक्षण घेतले आहे. ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (Defense Services Staff College), वेलिंग्टनचे माजी विद्यार्थीही आहेत. त्यांच्या नावावर आणखी एक कामगिरी आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातून त्यांनी प्रशिक्षणही घेतले आहे. (Air Marshal Amar Preet Singh)
(हेही वाचा – वाहन चालकांनो Atal Setu वर ट्रॅफिक नियम मोडाल तर, सावधान… )
वयाच्या 59 व्या वर्षी केले उड्डाण
भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख बनलेले एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांनी अलीकडेच भारतीय लढाऊ विमान तेजस उडवून सर्वांनाच आश्चर्यचकित केले नाही तर त्यांच्या वयामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जेव्हा त्यांनी तेजस विमान उडवले तेव्हा ते 59 वर्षांचे होते. त्यांच्या सेवेबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा पदक आणि अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community