वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने विविध उपाययोजनांना गती दिली आहे. याअंतर्गत सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करुन ते पाण्याने धुवून काढण्याची कामे वेगाने केली जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, मुंबईत टप्प्याने जास्तीत जास्त रस्ते धुण्याचे उद्दिष्ट निश्चित करत महानगरपालिका प्रशासनाने त्यादृष्टीने नियोजन केले आहे. (Air Pollution)
मुंबई महानगरातील वायू प्रदूषण आणि त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी महानगरपालिका प्रशासनाने सक्रिय पावले उचलावीत, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली होती. मुंबईसह महानगरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका, तसेच राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी एकत्रित कार्यवाही करावी. प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये नागरिकांना सहभागी करून घेत लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, असे निर्देश देखील मुख्यमंत्री यांनी दिले होते. (Air Pollution)
त्यानुसार, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये रस्ते, पदपथ धुवण्याची कामे वेगाने सुरू आहेत. (Air Pollution)
रस्ते, पदपथ पाण्याने धुवून काढण्याची कार्यवाही वेगाने
यासंदर्भात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले की, मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यातून धूळ पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावेत. त्याचबरोबर साचलेली धूळ हटवण्याची कार्यवाही करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार रस्ते आणि पदपथ यावरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी, महानगरपालिकेच्या वतीने वाहन आधारित धूळ प्रतिबंधक यंत्र (vehicle mounted anti-smog machines) कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यासोबतच, सर्व प्रशासकीय विभागांमध्ये प्रामुख्याने जिथे वर्दळ अत्याधिक आहे, अशा परिसरांमध्ये रस्ते, पदपथ यांची विशेष स्वच्छता तसेच पाण्याचे धुवून काढण्याची कार्यवाही वेगाने केली जात आहे. सध्या संपूर्ण मुंबईत मिळून सुमारे ५८४ किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करुन धुवून काढण्यात येत आहेत. यात पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, पूर्व मुक्त मार्ग यांसह स्वामी विवेकानंद मार्ग, वांद्रे ते सांताक्रूज पश्चिम यांना जोडणारा जोड मार्ग आणि लालबहादूर शास्त्री मार्ग आदींचा समावेश आहे. (Air Pollution)
रस्ते धुण्यासासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर
या स्वच्छता कामांसाठी पाण्याचे १२१ टँकर आणि स्लज डिवॉटरींग, फायरेक्स टँकर, सूक्ष्मजल फवारणी यंत्र यांचादेखील वापर केला जात आहे. प्रशिक्षित मनुष्यबळही नेमण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुनर्प्रक्रिया केलेल्या तसेच स्थानिक स्रोतांमधील पाण्याचा अर्थात विहिरींमधील पाण्याचा यामध्ये प्रामुख्याने वापर केल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी नमूद केले. (Air Pollution)
(हेही वाचा – Skill Development Center : महापालिकेच्या सर्वच माध्यमिक शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र)
धुतल्या जाणाऱ्या रस्त्यांची संख्या, धुतल्या गेलेल्या रस्त्यांची लांबी (किलोमीटर) प्रमाणे –
ए विभाग: १८ रस्ते, २१.८९ किमी
बी विभाग: ५ रस्ते, १२.२० किमी
सी विभाग: १२ रस्ते, १८.१६ किमी
डी विभाग: १७ रस्ते, २३.२७ किमी
ई विभाग: १९ रस्ते, ११.११ किमी
एफ उत्तर विभाग: १८ रस्ते, २०.५० किमी
एफ दक्षिण विभाग: १३ रस्ते, २०.०० किमी
जी उत्तर विभाग: ११ रस्ते, ६०.६० किमी
जी दक्षिण विभाग: ११ रस्ते, १९.४५ किमी
एच पूर्व विभाग: १५ रस्ते, १४.४० किमी
एच पश्चिम विभाग: १३ रस्ते, २६.३५ किमी
के पूर्व विभाग: ८ रस्ते, २८.१५ किमी
के पश्चिम विभाग: ८ रस्ते, १६.७९ किमी
पी उत्तर विभाग: १० रस्ते, २१.१० किमी
पी दक्षिण विभाग: १५ रस्ते, २३.९१ किमी
एल विभाग: ११ रस्ते, २१.५० किमी
एम पूर्व विभाग: ०६ रस्ते, ११.०० किमी
एम पश्चिम विभाग: १६ रस्ते, ३४.४० किमी
एन विभाग: १२ रस्ते, १६.७० किमी
एस विभाग: ०७ रस्ते, १८.०० किमी
टी विभाग: ०८ रस्ते, १३.५० किमी
आर मध्य विभाग: १० रस्ते, २१.७० किमी
आर उत्तर विभाग: १० रस्ते, २४.४२ किमी
आर दक्षिण विभाग: १० रस्ते, १९.७० किमी (Air Pollution)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community