हवा प्रदूषण रोखण्यासाठी आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष करून (Air Pollution) उपाययोजना न करणाऱ्या आज (ता. २५) आणखी ६७ बांधकाम व्यावसायिकांनी पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने काम थांबविण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. यात प्रामुख्याने मध्यवर्ती पेठा, कोरेगाव पार्क, बाणेर बालेवाडी या भागाचा समावेश आहे.
नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालविल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने नियमावली जाहीर करत धूळ निर्माण होऊ नये, हवेत उडू नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. यामध्ये २५ फुटापर्यंत पत्रे, हिरव्या ज्यूटचे कापड लावून धूळ उडण्याचे प्रमाण कमी करणे, पाणी मारणे अशी कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या पथकाकडून प्रदूषण रोखण्यासह सुरक्षेसंदर्भात प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम प्रकल्पास काम का थांबवू नये अशी नोटीस बजावली आज आहे.
(हेही वाचा – MNS Aandolan : मराठी पाट्या न लावल्याने मनसेने ठाण्यातील दुकानाच्या पाट्यांना फासलं काळ)
गेल्या दोन दिवसात ५७ जणांना नोटीस
गेल्या दोन दिवसात ५७ जणांना नोटीस बजावली होती. पण झोन क्रमांक ३ बाणेर, बालेवाडी, कोथरूड, वारजे, झोन क्रमांक ४ विमाननगर, कोरेगाव पार्क आणि झोन क्रमांक ७ मधील सर्व पेठा या या भागातील एकाही बांधकामास नोटीस बजावलेली नव्हती. दिवसभरात बजावण्यात आलेल्या ६७ नोटिसांपैकी ६० नोटीस झोन क्रमांक ३, ४ आणि ७ मधील आहेत. यामध्ये झोन क्रमांक ३ मध्ये १८, झोन क्रमांक ४ मध्ये १७ आणि झोन क्रमांक ७ मध्ये २५ बांधकामांना नोटीस बजावली आहे, तर झोन क्रमांक १ मध्ये २ तर झोन क्रमांक २ मध्ये ५ नोटीस देण्यास आल्या आहेत. आत्तापर्यंत एकूण १२४ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे, असे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community