- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात असून आता मुंबईतील सेवा संस्थांकडून टाकल्या जाणाऱ्या वाहिनींकरता खोदकामाला यापुढे परवानगी दिली जाणार नाही. मुंबईतील सर्व युटीलिटीजच्या चर खोदण्यास तथा खोदकामाला बंदी केली जाणार असून प्रत्येक विभाग कार्यालयाला तशाप्रकारच्या सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दिले आहेत. (Air Pollution)
(हेही वाचा – RMC Plant : मुंबईसह आसपासच्या विभागातील सिमेंट काँक्रिट प्लांट आणि रेडीमिक्स वाहनांवर बंदी)
मुंबईत नागरी सुविधा पुरवण्यासाठी अंतर्गत व बाह्य उपयोगिता अर्थात युटीलिटीजच्या सेवा पुरवठादार संस्थाकडून महापालिकेचे पदपथ आणि रस्त्यांवर चर खोदण्यात येतात. या खोदलेल्या चरांची भरणी महापालिकेच्या माध्यमातून नियुक्त कंत्राटदारांकडून करण्यात येतात. मात्र, वाढत्या प्रदूषणाच्या समस्यांमुळे मुंबईतील विविध भागांमध्ये अशा युटीलिटीज टाकण्यासाठी तथा दुरुस्त करण्यासाठी नवीन खोदकाम करण्यास परवानगी देण्यात येऊ नये अशाप्रकारच्या सूचना प्रत्येक विभाग कार्यालयाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे मुंबईतील एकही रस्ता आणि पदपथ युटीलिटीज करता खोदता येणार नाही. (Air Pollution)
(हेही वाचा – Arunachal Pradesh मध्ये जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी लागू होणार धर्मस्वातंत्र्य कायदा)
मुंबईत पावसाळ्यात रस्ते व पदपथ खोदण्यास परवानगी दिली जात नसून अत्यावश्यक बाब असेल तरच परवानगी दिली जाते. परंतु ऑक्टोबर महिन्यापासून विविध रस्ते व पदपथाखालून जाणाऱ्या सेवा सूविधांच्या जाळ्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच नव्याने सुविधांचे जाळे टाकण्याच्या कामांना सुरुवात केली जाते. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या विभाग स्तरावर दिल्या जाणाऱ्या परवानगी यापुढे न देण्याचे निर्देश आयुक्तांकडून प्राप्त झाल्यामुळे यापुढे एकाही रस्त्यावर तसेच पदपथावर खोदकाम हे पुढील निर्देश मिळेपर्यंत केले जाणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. (Air Pollution)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community