Air Pollution : बोरिवली पूर्व आणि भायखळा येथील विकासकामे बंद! वरळी, कुलाबा नेव्ही नगर रडारवर

1538
Air Pollution : बोरिवली पूर्व आणि भायखळा येथील विकासकामे बंद! वरळी, कुलाबा नेव्ही नगर रडारवर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील हवेची गुणवत्ता काही भागांमध्ये खालवली जात असून अशा प्रदूषित भागांवर आता मुंबई महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईतील बोरिवली पूर्व आणि भायखळा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषित हवा निर्माण झाल्याने येथील सर्व खाजगी आणि शासकीय प्रकल्प कामे तथा विकासकामे यांच्यावरती बंदी घालण्यात आली आहे. तसेच २०० पेक्षा खाली हवेतील प्रदूषित मानांक कमी आलेल्या ठिकाणांमध्ये म्हणजेच वरळी आणि कुलाबा नेव्ही नगर आदी भागांमध्ये विकासकामांवर विशेष लक्ष ठेवले जात असून लवकरात या सर्व बांधकामांवर बंदी आणली जाईल, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता या विषयाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी महानगरपालिका मुख्यालयात संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी आदी उपस्थित होते. (Air Pollution)

(हेही वाचा – Mahakumbh मध्ये जगातील सर्वात मोठे १५१ फूट उंच त्रिशूळ; भूकंप आणि वादळानेही पडणार नाही)

आयुक्तांनी यावेळी बोलतांना, मुंबईत सुमारे २२०० खासगी विकासक तथा संस्था यांची विकासकामे सुरू असून या व्यतिरिक्त शासकीय नागरी सुविधा कामे आणि पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी दुषित प्रदूषित हवामानाचा निर्देशांक २०० च्या वर आढळून आलेल्या ठिकाणांची म्हणजे बोरिवली पूर्व आणि भायखळा आदी भागांमध्ये सर्व खाजगी व शासकीय विकासकामे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येथील सर्व विकासकामे तातडीने बंद करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. तर प्रदूषित हवामानाचा निर्देशांक २०० च्या खाली आहे अशा वरळी आणि कुलाबा नेव्ही नगर येथील कामांना प्रदूषण नियंत्रणात आणण्याचा सूचना केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न झाल्यास तेथील कामे आहे तातडीने बंद करण्यात येतील अशा प्रकारची माहिती गगराणी यांनी दिली आहे.

नोव्हेंबर २०२४ पासून आजपर्यंत महानगरपालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून एकूण ८७७ बांधकाम प्रकल्पांची पाहणी. २८ मुद्यांची मार्गदर्शक सूचना, ‘ईएमपी’चे पालन होत आहे की नाही, याची सातत्याने तपासणी. नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना प्रारंभी लेखी सूचना (intimation). नंतर ‘कारणे दाखवा नोटीस’ आणि ‘काम थांबवण्याची नोटीस’ बजावली जात आहे. आतापर्यंत सुमारे २८६ ठिकाणी ‘काम थांबवण्याची नोटीस’ दिली आहे. जर काम थांबवण्याची नोटीस दिल्यानंतर विकासकांनी तथा संस्थेने काम सुरू ठेवल्यास संबंधितांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. (Air Pollution)

(हेही वाचा – ‘थर्टी फस्ट’च्या पार्टीत व्यभिचाराला प्रोत्साहन; पुण्यातील पबकडून Condom च्या पाकिटांचे वाटप)

थंडीच्या कालावधीत कोरडे वारे आणि ढगाळ हवामान

हिवाळ्यात वाऱ्याचा कमी वेग आणि कमी तापमान यामुळे नैसर्गिक वायुवीजन कमी. त्‍यासमवेतच थंडीच्या कालावधीत कोरडे वारे आणि ढगाळ हवामान या कारणांमुळे वायू प्रदूषणात वाढ होते. वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना आवाहन 
  • वायू प्रदूषण टाळण्यासाठी शासन आणि प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांमध्ये नागरिकांचे सहकार्य व सहभाग देखील मोलाचे.
  • नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करणे हितावह.
  • शक्य तितक्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, खासगी वाहनांचा वापर कमी करणे, उघड्यावर कचरा जाळू नये, यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. (Air Pollution)
प्रदूषण कालावधीत आरोग्यविषयक सल्ला 
  • वायू गुणवत्ता निर्देशांक, वाईट ते अतिधोकादायक असलेल्या दिवसांमध्ये धावणे, जॉगिंग व कठोर शारीरिक व्यायाम/श्रम टाळावेत.
  • वायू प्रदूषणाच्या कालावधीत फटाके फोडणे टाळावे.
  • सिगारेट, बिडी आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये.
  • घरामध्ये स्वच्छता करताना झाडू मारणे ऐवजी ओल्या फडक्याचा वापर करावा.
  • बंद घरामध्ये डासांच्या कॉइल, अगरबत्ती जाळणे टाळावे.
  • निरोगी आहार फळे, भाज्या आणि पाणी इत्यादींचे सेवन करावे.
  • श्वसनाचा त्रास, चक्कर येणे, खोकला, छातीत अस्वस्थता किंवा वेदना असल्यास जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अथवा नजीकच्‍या महानगरपालिका दवाखाना/रुग्णालयात भेट द्यावी.
  • प्रदूषण कालावधीत घराबाहेर जायचे असल्यास डिस्पोजेबल मास्कचा वापर करावा. (Air Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.