वाढत्या वायूप्रदूषणामुळे मानवी शरीरावर घातक परिणाम होऊ लागले आहेत. खराब हवेत साठीपार व्यक्ती तासभर अडकल्यास त्यांना हृदय विकाराची शक्यता वाढत असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. परदेशात वायूप्रदूषणामुळे होणा-या दुष्परिणामांवर वैद्यकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या उपाययोजना तसेत धोरणात्मक निर्णयांसाठी हालचाली केल्या जात आहेत. त्याच धर्तीवर आता भारतातही काम करणे गरजेचे असल्याचे मत पुणे येथील पल्मोकेअर रिसर्च फाऊंडेशनच्या डॉ संदीप साळवी यांनी दिली.
वातावरणात आता वाढत्या प्रदूषणामूळे तीव्र सूक्ष्म धूलिकण वाढू लागले आहेत. तीव्र सूक्ष्म धूलिकण फुप्फुसावाटे रक्तात जातात. रक्तामधून संपूर्ण शरीरात पोहोचतात. परिणामी, आता हृदयालाही तीव्र सूक्ष्म धूलिकणांचा धोका पोहोचू लागला आहे. तीव्र सूक्ष्म धूलिकण हे कॉलेस्ट्रोलपेक्षाही घातक असतात. अशा वातावरणात साठ वर्षांपुढील व्यक्ती तासभर राहणे हे आरोग्यासाठी घातक असल्याचे डॉ. साळवी सांगतात. याबाबत दहा वर्षांपूर्वीच न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये जर्नल प्रसिद्ध झाले आहे.
( हेही वाचा: मांजर समजून पाळले वाघाटीला…वाचा कुठे घडला प्रकार )
अमेरिकेत सोसायटी ऑफ कार्डिओलोजी यांनी वायूप्रदूषणात माणसांनी घ्यावयाची काळजी याबाबतीत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आता दिल्लीप्रमाणे निदान मुंबईसारख्या मेट्रोपोलीन शहरांत वाढत्या प्रदूषणाला नियंत्रणात आणण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यायला हवे,असेही डॉ. साळवी यांनी सूचवले. भारतात हृदयविकारावर कितपत परिणाम होतो, यावरही संशोधन होणे गरजेचे असल्याचे मतही डॉ. साळवी यांनी व्यक्त केले.
डॉक्टरांची भूमिका
वायूप्रदूषणामुळे हृदयावर अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो. याबाबतीत संशोधनाची गरज असल्याचे मत ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे यांनी दिली. संशोधनानंतरच हृदयावर वायूप्रदूषणामुळे कितपत परिणाम होतोय, याची स्पष्टता येईल, असेही डॉ. सुरासे म्हणाले.
Join Our WhatsApp Community