मुंबईतील हवेतील प्रदूषणाचा सर्वाधिक दुष्परिणाम मुंबई वाहतूक पोलिसांच्या प्रकृतीवर होत आहे. डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे, आणि खोकला या प्रकारचा त्रास मुंबईतील अनेक पोलीस अंमलदारांना सुरू आहे. या अवस्थेत देखील वाहतूक अंमलदार तासनतास रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियंत्रण करावी लागत आहे. (Air pollution)
मागील काही महिन्यांपासून मुंबईतील हवा प्रदूषित झाली आहे. या सर्वांना कारणीभूत मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे आहेत. त्याच बरोबर मुंबईत वाढत्या वाहनांमुळे देखील शहरातील हवा प्रदूषित होत आहे. या हवेतील वाढत्या प्रदूषणाचा त्रास मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात जाणवू लागला असून, अनेकांना डोळ्यांत धुळीचे कण जाऊन डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे आणि खोकला यासारखा त्रास सुरू आहे. (Air pollution)
मुंबईच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रित करणारे वाहतुक पोलीस अंमलदार हा सर्वाधिक हवेच्या प्रदूषणाचा बळी पडत आहे. वाहतूक नियंत्रण करताना वाहनातून निघणारा धूर, सिमेंट मिक्सर, बांधकामाचा राडारोडा (डेब्रिज) वाहून नेणारे ट्रक यातून रस्त्यावर होणारे प्रदूषण व सध्या हवेतील प्रदूषणामुळे वाहतूक पोलीस अंमलदार यांना डोळे चुरचुरणे, खोकला, श्वसनचा त्रास होत आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगरात सर्वाधिक बांधकामे सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी हवेत सर्वाधिक प्रदूषणाचा निर्देशांक नोंदविण्यात आलेला आहे. (Air pollution)
(हेही वाचा – Firecrackers Stock Seized : सावरकर मंडईसह दादरमधून लाखो रुपयांच्या फटाक्यांचा साठा जप्त)
बांधकामांसह दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरात वाहतुक कोंडीचे प्रमाण अधिक असल्यामुळे तेथील प्रदूषणात अधिक वाढ होत आहे, त्यामुळे या परिसरातील वाहतूक पोलिसांवर हवेतील प्रदूषणाचा सर्वाधिक दुष्परिणाम दिसून येत आहे. वायू प्रदूषण आणि हवेतील धूलिकणांपासून बचाव करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मास्क देण्यात आलेले असले तरी, सतत मास्क लावल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सतत मास्क लावू शकत नाही अशी प्रतिक्रिया काही वाहतूक पोलिसांनी दिली आहे. वय वर्षे ५० च्या पुढे असणाऱ्या अंमलदारांना या प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास होत असल्याचे एका वाहतूक पोलीस अंमलदारांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले. (Air pollution)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community