आली दिवाळी, मुंबईची हवा ‘बिघडली’

कुलाब्यात अतिसूक्ष्म धूलिकणांचा दर्जा ३४६, माझगावात ३५६ तर वांद्रे -कुर्ला संकुलात ३१३ पर्यंत नोंदवला गेला.

90

दिवाळीच्या दिवसांत मुंबईच्या हवेची गुणवत्ता सलग दुस-या दिवशी अतिखराब आढळून आली. कुलाबा, माझगाव आणि वांद्रे-कुर्ला संकुलात प्रत्येकी अतिसूक्ष्म धूलिकणांचा खालवलेला दर्जा ३१८, ३२२ आणि ३०१ असा प्रत्येकी आढळून आला. मुंबईच्या हवेचा दर्जा तपासणा-या सफर या प्रणालीतून ही माहिती मिळाली. गुरुवारीही मुंबईच्या हवेची गुणवत्ता अतिवाईट वर्गावर अर्थात ३००च्याही वर राहणार असल्याचा इशाराही सफरने दिला आहे.

आरोग्याच्या तक्रारी उद्भवणार 

मंगळवारपासून मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचे मापन खाली घसरत असल्याचे आढळून येत असल्याची माहिती सफरकडून दिली गेली. मंगळवारीही कुलाबा, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुलात हवेची गुणवत्ता खालावलेली होती. कुलाब्यात अतिसूक्ष्म धूलिकणांचा दर्जा ३४६, माझगावात ३५६, तर वांद्रे -कुर्ला संकुलात ३१३ पर्यंत नोंदवला गेला. बुधवारीही या तिन्ही ठिकाणी खालावलेल्या हवेचा दर्जा तसाच आढळून आला. त्यामुळे हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांचा दर्जा जास्त खालावलेला असल्यास तब्येतीच्या तक्रारी वाढण्याचा इशाराही सफरकडून देण्यात आला आहे. या ठिकाणी भेट देण्याचे नियोजन असल्यास आवश्यक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. कोरोनामुळे मागील वर्षी दिवाळीत कडक निर्बंध लागू केले होते. तेव्हा फटाक्यांची आतषबाजी झाली नव्हती. पहिल्यांदा दिवाळीच्या काळात मुंबईची हवा शुद्ध राहिली होती. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाचा संसर्ग कमी झाला, बाजार खुला झाल्याबरोबर फटाक्यांना जोर आला, दिवाळी सुरु होण्याच्या आदल्या दिवसापासूनच हवेचा स्तर घसरत चालला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.