Air Pollution : एका दिवसांत मुंबईतील १८९ राडारोडा महापालिकेने केला जमा

60
Air Pollution : एका दिवसांत मुंबईतील १८९ राडारोडा महापालिकेने केला जमा
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरातील वायू प्रदूषण (Air Pollution) कमी करण्यासाठी, विशेषतः धूळ नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने समर्पित प्रयत्न सुरू केले आहेत. वायू गुणवत्ता सुधारणा अभियान अंतर्गत शनिवार २८ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात, एकाच दिवसात १८९ मेट्रिक टन राडारोड्याचे (डेब्रिज) गोळा करण्यात आले. तर, सुमारे २४३ किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले. तसेच नियमभंग करणाऱ्यांकडून २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वातावरणातील बदलांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊन वायू प्रदूषणात (Air Pollution) वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेच्यावतीने मार्गदर्शक तत्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती यापूर्वीच लागू करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Military School : महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाड येथे प्रा. महेश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन)

मुंबईतील वायू प्रदूषण (Air Pollution) नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

मुंबई महानगरात गत ५४ आठवड्यांपासून संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरुप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात (वॉर्ड) नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण २२७ स्थानिक संस्था प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. या अंतर्गत २८ डिसेंबर २०२४ रोजी सर्व प्रशासकीय विभागात लोकसहभागातून संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

(हेही वाचा – चंद्रशेखर बावणकुळेंनी केली तीन समितीची घोषणा; Ravindra Chavan यांच्यावर सोपवली ‘ही’ जबाबदारी)

यामध्ये, १ हजार ६८२ कामगार, कर्मचाऱ्यांनी १९० संयंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी केली आहे. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, मेकॅनिकल स्वीपर, ई-स्वीपर, लीटर पीकर मशीन, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध आणि फायरेक्स मशीन, मिस्टींग मशीन यासह अन्य अद्ययावत यंत्रणा दिमतीला होती. दरम्यान, स्वच्छतेचे नियमभंग करणाऱ्या नागरिकांकडून २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (Air Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.