Air Pollution : पुण्याची हवा मुंबईपेक्षा अधिक प्रदूषित

143

सध्या देशभरात महत्वाच्या शहरांमध्ये हवेचे प्रदूषण (Air Pollution) वाढले आहे. कालपर्यंत दिल्लीमध्ये हवेच्या प्रदूषणाचा उच्चांक असायचा आता कोलकाता, मुंबई पाठोपाठ पुणे शहराचीही हवा अधिक प्रदूषिक झाल्याचे दिसून आले आहे. हे चिंतेची बाब बनली आहे.

पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक 161 वर असून मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 145 वर आहे. पुण्यातील गजबजलेल्या शिवाजीनगर परिसरातील एक्यूआय वाईट श्रेणीत असून हवा गुणवत्ता पातळी 271 वर तर भुमकर चौकातील एक्यूआय 260 वर आहे. पुण्यातील पाषाण आणि कात्रजचा परिसर सोडता सर्वत्र हवा गुणवत्ता पातळी मॉडरेट श्रेणीत आहेत.

(हेही वाचाAir Pollution : हवेची गुणवत्ता बिघडली; सरकारने जारी केली नियमावली; मास्क वापरण्याचा सल्ला)

मुंबईतील चेंबूर परिसर सर्वाधिक प्रदूषित 

मुंबईतील चेंबूरमधील हवा सर्वाधिक प्रदूषित (Air Pollution)असल्याचे समोर आले आहे. येथील हवा गुणवत्ता पातळी अतिशय वाईट श्रेणीत दाखल झाली आहे. चेंबूर परिसरातील एक्यूआय 304 वर आहे. तर बदलापुरातील एक्यूआय 243, बेलापूर 138, नवी मुंबईतील एक्यूआय 261 तर उल्हासनगर 269 वर आहे. दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाकडून देखील मार्गदर्शक तत्व जारी करत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाकडून आवाहन 

दरम्यान राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने आता जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईतील प्रदूषणास (Air Pollution) धूलीकण, वाहनांची वाढती संख्या, बांधकाम, कारणीभूत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानेही चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या काळात मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली नाही, तर बांधकामांवर बंदी आणण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.