Air Pollution : हवेची गुणवत्ता खालावली; सरकारने जारी केली नियमावली; मास्क वापरण्याचा सल्ला

152
सध्या दिल्लीसह मुंबईतील हवेची गुणवत्ता बरीच ढासळली (Air Pollution) आहे, त्यामुळे आता या वायू प्रदूषणाचा परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे, म्हणून आता स्वतः राज्य सरकारने यावर नियमावली जारी केली आहे. ज्यामध्ये काय करावे आणि काय करू नये असे सांगतानाच सरकारने एन ९५ मास्क लावण्याची सूचनाही केली आहे.
वाहनातून बाहेर पडणारे वायू, रस्त्यावरील धूळ, बांधकामाची धूळ, कचरा जाळणे, शेतीतील पिकांचे अवशेष जाळणे, औद्योगिक उत्सर्जन, जीवाश्म इंधनावर चालणारे औष्णिक ऊर्जा प्रकल्प आणि वीटभट्ट्या, घरातील बायोमास जाळणे, फटाके जाळणे इ. कारणांमुळे तर घरगुती वायू प्रदूषण हे लाकूड, कोळसा, शेत, चुलीमध्ये किंवा स्वयंपाक आणि पाणी गरम करण्याच्या उद्देशाने जैव इंधन जाळल्यामुळे होते. घरातील वायू प्रदूषण डासांच्या कॉइल, अगरबती, सिगारेट, बिडी, फवारण्या, सॉल्व्हॅट्स आणि इमारतींच्या आतील भागात वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या धुरामुळे वायू प्रदूषण  (Air Pollution) होत असल्याचे सरकारने म्हटले आहे.
वायू प्रदूषणाचा पाच वर्षांखालील मुले व वृद्धापकाळातील व्यक्ती, गरोदर महिला, गर्भातील बाळ, दुर्धर आजार असलेल्या व्यक्ती, वाहतूक पोलिस, वाहतूक स्वयंसेवक, बांधकाम कामगार, रस्ते सफाई कामगार, रिक्षाचालक, रिक्षाचालक, रस्त्याच्या कडेला असणारे विक्रेते आणि प्रदूषित वातावरणात घराबाहेर काम करणारे इतर लोक यांना या प्रदूषणाचा परिणाम होत आहे.

नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी? 

  • संथ आणि रहदारी असलेले रस्ते प्रदूषण कारी उद्योगांजवळील क्षेत्रे, बांधकाम पाडण्याची ठिकाणे, कोळशावर आधारित अशी उच्च प्रदूषण असलेली ठिकाणे, टाळा वीज प्रकल्प व वीटभट्टी इत्यादी ठिकाणी जाणे टाळा.
  • एक्यूआय पातळीनुसार बाहेरील कामांचे वेळापत्रक तयार करा आणि खराब से गंभीर एक्यूआय असलेल्या दिवसामध्ये घरातच रहा.
  • खराब ते गंभीर एक्यूआय असलेल्या दिवसांमध्ये, सकाळी आणि संध्याकाळी उशिरा चालणे, धावणे, जोगिंग आणि शारीरिक व्यायाम टाळा.
  • सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत खिडक्या आणि दरवाजे उघडू नका, गरज पडल्यास दुपारी 12 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर पडू शकतात.
  • लाकूड, कोळसा, जनावरांचे शेण, रॉकेल यांसारखे बायोमास जाळणे टाळावे. स्वयंपाक आणि उष्णतेच्या उद्देशाने स्वच्छ धूररहित इंधन (गॅस किंवा वीज) वापरा. बायोमास वापरत असल्यास स्वच्छ कक स्टोव्ह वापरा.
  • घरांमध्ये झाडू मारण्याऐवजी किंवा व्हॅक्यूम साफ करण्याऐवजी ओल्या कपड्याचा वापर करा. आपण व्हॅक्यूम क्लीनर वापरणे निवडल्यास, ज्यात उच्च कार्यक्षमता पार्टिकुलेट एअर (एवईपीए) फिल्टर आहे ते वापरा.
  • नियमितपणे वाहत्या पाण्याने डोळे धुत रहा आणि कोमट पाण्याने नियमित पणे गुळण्या करा.
  • श्वसनाचा त्रास, चक्कर येणे, खोकला, छातीत अस्वस्थता किंवा वेदना, डोळ्यांमध्ये जळजळ (लाल किंवा पाणी) असल्यास जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • निरोगी आहार, अँटीऑक्सिडंट्ससमृद्ध फळे आणि भाज्या आणि पाणी पिऊन पुरेशा प्रमाणात शरीरामधील पाण्याची पातळी राहील याची काळजी घ्या
  • डिस्पोजेबल एन 95 किंवा एन 99 मास्क वापरा
  • कागदी मास्क रुमाल, स्कार्फ आणि कापड वापरू नका

(हेही वाचा Anil Parab : दापोलीचे Sai Resort पाडून टाका; खेड जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.