शिकागो विद्यापीठाच्या ‘एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट’ने २९ ऑगस्ट रोजी ‘एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स’ (AQLI) २०२३ हा अहवाल सादर केला आहे. या अहवालातून हवा प्रदूषणासंदर्भात (Air pollution) धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालामध्ये प्रदूषणामुळे लोकांच्या आयुर्मानावर होणाऱ्या परिणामांविषयी सांगितले जाते. हवा प्रदूषणाच्या समस्येचा दक्षिण आशियातील लोकांच्या आयुर्मानावर गंभीर परिणाम झाला आहे. प्रदूषणामुळे त्यांचे आयुष्य ५.१ वर्षांनी कमी झाले आहे, असे अहवालातील अभ्यासातून दिसून आले आहे. बांगलादेश, भारत, नेपाळ आणि पाकिस्तानसारख्या देशांतील लोकांचा यामध्ये समावेश आहे.
(हेही वाचा – China’s New Map : चीनच्या नवीन नकाशामुळे भारतासह अन्य देशही संतप्त; म्हणाले …)
हवा प्रदूषणाचा (Air pollution) सर्वांत जास्त धोका असणाऱ्या दक्षिण आशियाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. या समस्येमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा धोका वाढला आहे. हवा प्रदूषणामुळे व्यक्तीचे सरासरी आयुष्य ५.३ वर्षांनी कमी होत आहे. त्याशिवाय आरोग्याच्या इतर समस्यांमुळे भारतीयांचे आयुष्य जवळपास ४.५ वर्षांनी कमी होत आहे. जर प्रदूषणाची पातळी २००० वर असती, तर देशातील लोकांचे आयुर्मान हे फक्त ३.३ वर्षांनी कमी झाले असते; पण गेल्या काही वर्षांमध्ये प्रदूषणाच्या पातळीत अतिप्रमाणात वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या इत्यादी कारणांमुळे प्रदूषणामध्ये वाढ दिसून येत आहे. इंधनाच्या अतिवापरामुळे प्रदूषणावर थेट परिणाम दिसून येत आहे. भारत आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्ये २००० या वर्षापासून वाहनांची संख्या चौपट झाली आहे; तर बांगलादेशमध्ये २०१० ते २०२० दरम्यान वाहनांच्या संख्या तिपटीने वाढली आहे. जागतिक स्तरावर भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत जास्त प्रदूषित देश आहे. भारतातील १.३ अब्ज लोकसंख्या प्रदूषणाची पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त आहे, अशा भागात राहते. भारतातील ६७.४ टक्के लोकसंख्या भारताच्या नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्सपेक्षा जास्त प्रदूषित हवा असलेल्या भागात राहते. (Air pollution)
हवा प्रदूषणाचा परिणाम भारताच्या उत्तरेकडील भागांवर सर्वांत जास्त दिसून आला आहे. येथील लोकसंख्या ही खूप जास्त आहे. देशाची राजधानी दिल्लीत हवा प्रदूषणाच्या समस्येचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. हवा प्रदूषणासारख्या समस्येचा सामना करण्यासाठी सरकार, उद्योग आणि वैयक्तिकरीत्या प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे. सार्वजानिक वाहनांचा वापर, हवा प्रदूषणाविरोधात जनजागृती करणे, इत्यादी गोष्टींमुळे ही समस्या सोडविणे सोपे जाईल. प्रदूषणाविरोधात उचललेले हे पाऊल केवळ पर्यावरणाला वाचवण्यासाठी नाही, तर मानवी जीवनसुद्धा सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकते. (Air pollution)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community