Air Pollution : भायखळ्यातील ३३ आणि बोरिवली पूर्वेतील ४५ बांधकामांना स्टॉप वर्क नोटिस

65
Property Tax : मुंबई महापालिकेकडून ६८ टक्के मालमत्ता कराची वसुली
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याने महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. परंतु, या उपाय योजना करूनही सातत्याने वायू गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा अधिक राहिल्याने बोरिवली पूर्व आणि भायखळा आदी भागातील सर्व विकास कामांवर बंदी आणण्यात आली आहे. त्यानुसार, मंगळवारी, ३१ डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत भायखळा परिसरातील ३३ आणि बोरिवली (पूर्व) भागातील ४५ बांधकामांना काम थांबवण्याच्या नोटिस (स्टॉप वर्क नोटिस) देण्‍यात आल्‍या आहेत. (Air Pollution)

बांधकाम प्रकल्पांद्वारे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पुढाकार घेत २८ मुद्यांची सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. याशिवाय, प्रकल्प प्रवर्तक/इमारत विकासक आणि स्थापत्य प्रकल्प (यांत्रिकी व विद्युत) कंत्राटदारांना पर्यावरण व्यवस्थापन योजना (ईएमपी) तयार करणे बंधनकारक केले आहे. (Air Pollution)

(हेही वाचा – Crime : आईने प्रसंगावधान दाखवून शस्त्रधारी दरोडेखोराच्या तावडीतून मुलीची केली सुटका)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने नोव्हेंबर २०२४ पासून आजपर्यंत एकूण ८७७ बांधकाम प्रकल्पांची पाहणी करून २८ मुद्यांची मार्गदर्शक सूचना, ‘ईएमपी’चे पालन होत आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे. त्यानुसार, नियमांचे पालन न करणा-या बांधकाम प्रकल्पांना ‘कारणे दाखवा नोटीस’ आणि काम थांबवण्याची नोटिस दिल्या जात आहेत. (Air Pollution)

सातत्याने वायू गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा अधिक राहिल्यास कठोर पावले उचलली जात असून विविध उपाययोजना राबवूनदेखील वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) जर सातत्याने २०० पेक्षा जास्त जात असेल तर त्या परिसरातील कारणीभूत उद्योग आणि बांधकामे Graded Response Action Plan (GRAP- 4) अंतर्गत बंद करण्यात येत आहेत. यानुसार बोरिवली पूर्व आणि भायखळा आदी भागातील हवेतील प्रदूषणात वाढ झाल्याने या भागातील बांधकामांची पाहणी करून काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. (Air Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.