हवा अजूनही खराब.. खोलीच्या खिडक्या बंद ठेवण्याचे आवाहन

101

मुंबईत हवेची गुणवत्ता सलग तिस-या दिवशी अतिखराब नोंदवली गेली. सतत हवेचा दर्जा खराब असल्याने दरवाज्यांच्या खिडक्याही बंद ठेवा, परिसरात लाकूड किंवा मेणबत्त्याही पेटवू नका, असे आवाहन सफर या हवेची गुणवत्ता मोजणा-या ऑनलाईन प्रणालीतून करण्यात आले आहे. बुधवारी दिल्लीची हवा २९७ वर नोंदवलेली असताना मुंबईतील हवेचा दर्जा २९३ वर पोहोचला. दोन्ही ठिकाणांतील हवेचा दर्जा अतिखराब असल्याचे निरीक्षण सफरने नोंदवले. मुंबईत गुरुवारीही हवेचा दर्जा खराबच राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

( हेही वाचा : पेण अर्बन बॅंक गैरव्यवहार : ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश )

किनारपट्टीजवळ वसलेल्या मुंबईत दिल्लीच्या तुलनेत केवळ चार आकड्याने हवेचा दर्जा कमी आढळला. एरव्ही मुंबई आणि दिल्ली येथील हवेच्या दर्ज्यात प्रचंड फरक दिसून येतो. तिस-या दिवशीही मुंबईतील हवेचा दर्जा खराब असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही सफरच्यावतीने करण्यात आले आहे.

काय काळजी घ्याल –

  • प्रभातफेरीला मोठे अंतर चालायला जाऊ नका. छोटे अंतर पायी चाला.
  • घरात स्वच्छता राखा, घरातील कोपरे तसेच तळभाग ओल्या कपड्याने पुसत रहा.
  • तोंडावर एन९५ किंवा पी-१०० असे मास्क वापरा.

मुंबईतील स्थानकांमधील धूलिकणांची मात्रा

अतिखराब वर्गवारीतील स्थानके – धूलिकणांचे प्रमाण (प्रति क्युबिक मीटरमध्ये )

  • माझगाव – ३८१
  • मालाड – ३२३
  • अंधेरी – ३०३
  • कुलाबा – ३०९
  • वांद्रे-कुर्ला संकुल – ३०९
  • बुधवारी केवळ भांडूप येथील स्थानकांतील हवेचा दर्जा २८० प्रति क्यूबीक मीटरमध्ये पोहोचल्याने केवळ या स्थानकांला अतिखराबऐवजी खराब वर्गवारीत सफरने नोंदवले
  • बोरिवली आणि नवी मुंबईतील हवा समाधानकारक नोंदवली गेली. बोरिवलीत हवेचा दर्जा १७३ तर नवी मुंबईतील हवेचा दर्जा १६९ प्रति क्युबिक मीटरमध्ये नोंदवले गेले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.