हवेचा दर्जा खालावला! सायंकाळी या भागांतून प्रवास करताना तोंडाला रुमाल बांधा…

91

मुंबईतील हवेचा दर्जा सुमार होत असल्याचे ‘सफर’ या केंद्रीय पृथ्वी व विज्ञान विभागाच्या ऑनलाईन प्रणालीतून निदर्शनास येत आहे. मुंबईत माझगाव, कुलाबा, चेंबूर, वांद्रे-कुर्ला संकुल, मालाड या भागांतून प्रवास केल्यास श्वसन विकारांना आमंत्रण देण्याची भीती या प्रणाली अंतर्गत व्यक्त केली जात आहे. या भागांतून सायंकाळी प्रवास करताना नाकावर रुमाल बांधा तसेच दमा असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हवेचा दर्जा ढासळल्याने सफरने मुंबईतील काही भागात रेड अलर्ट जारी केला आहे.

( हेही वाचा : धारावीचा पुनर्विकास कागदावरच; आतापर्यंत ३१.२७ कोटींचा खर्च)

हवेजा दर्जा खराब होण्याची कारणे

थंडीत वा-यांचा वेग मंदावतो. वारे इतस्तः जोमाने फिरत नाही. वाहतूक कोंडी असलेल्या शहरी भागांत इंधनामुळे हवेत मिसळणारे सूक्ष्म धूलिकण हवेच्या वरच्या थरांत जसेच्या तसे राहतात. अतिसूक्ष्म धूलिकण एकाच ठिकाणी साचल्याने हवेचा दर्जा खराब होतो. परिणामी, दृष्यमानता खराब होते.

हवेचा दर्जा अतिखराब असलेली स्थानके

स्थानके – अतिसूक्ष्म धूलिकणांचा दर्जा (प्रति क्युबिक मीटरमध्ये)

  • माझगाव – ३४९
  • चेंबूर – ३२१
  • कुलाबा – ३१४
  • मालाड – ३१३
  • वांद्रे-कुर्ला संकुल – ३११

खराब स्थानके 

हवेचा दर्जा खराब असलेली स्थानके – अतिसूक्ष्म धूलिकणांचा दर्जा (प्रति क्युबिक मीटरमध्ये)

भांडुप – २५६

बोरिवली – २०१

हवेचा दर्जा ठिक असलेली स्थानके – अतिसूक्ष्म धूलिकणांचा दर्जा (प्रति क्युबिक मीटरमध्ये)

नवी मुंबई – १०२

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.