- विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबई महानगरात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होते आहे किंवा कसे, याची पाहणी करण्यासाठी सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये मिळून बुधवारी २५ डिसेंबर २०२४ रोजी ८६८ बांधकामांच्या ठिकाणी पथकांनी भेटी दिल्या आहेत. मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन दिलेल्या मुदतीत करावे, यासाठी २८ बांधकाम प्रकल्पांना लेखी सूचना बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित बांधकाम प्रकल्प स्थळांनाही भेटी देण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. तसेच, महानगरपालिकेचे संबंधित इतर विभाग देखील ‘ऑटो डीसीआर’ सारख्या ऑनलाईन प्रणालीतून बांधकाम प्रकल्पांना लेखी सूचना देत आहेत.
वातावरणातील बदलामुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. त्याची दखल घेत, मुंबई महानगरातील वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने प्रभावी पावले उचलली आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये युद्ध पातळीवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (Air Quality Index)
(हेही वाचा – Raosaheb Danve यांचा रोख कुणाकडे? म्हणाले, ‘ते’, ‘ठाकरे पिता-पुत्रांमध्ये देखील भांडण लावतील’)
तसेच, मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी (Air Quality Index) सर्व संबंधित घटकांनीही प्रयत्न करणे आवश्यक असल्याने त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या नियमांचे पालन होते आहे, यावर देखरेख करण्यासाठी सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके संबंधित परिसराला भेट देऊन कामाच्या ठिकाणाची पाहणी करत आहेत. तसेच, कामाच्या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन दिलेल्या मुदतीत करावे म्हणून लेखी सूचना (intimation) देखील दिली जात आहे.
मुंबईतील सर्व २४ विभागांमधील पथकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात दिलेल्या भेटींचा एकत्रित विचार करता मुंबईतील ८६८ बांधकाम प्रकल्प स्थळांना प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या. तसेच, मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन दिलेल्या मुदतीत करावे, यासाठी २८ बांधकाम प्रकल्पांना लेखी सूचना बजावण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित घटक आणि यंत्रणांसाठी देखील ही मार्गदर्शक तत्वे अनिवार्य आहेत. महानगरपालिकेने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची तातडीने आणि दिलेल्या वेळेत अंमलबजावणी करावी अन्यथा बांधकाम थांबवण्याची नोटीस जारी करणे किंवा कामाचे ठिकाण सील करणे, यासारखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा महानगरपालिका (BMC) आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी पुन्हा एकदा दिला आहे. (Air Quality Index)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community