मुंबईतील रेल्वे स्टेशन्सवर लागणार हवेतून पाणी तयार करणारे यंत्र

122

मुंबईतील रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना मुलभूत सोयी-सुविधा पुरवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कायम प्रयत्न करण्यात येतात. प्रवाशांना मुबलक पाणी मिळावे या हेतूने रेल्वे प्रशासनाकडून एक अनोखी युक्ती करण्यात येणार आहे. मुंबईतील प्रमुख रेल्वे स्टेशन्सवर हवेतून पाणी तयार करणारे यंत्र बसवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना शुद्ध आणि मुबलक प्रमाणात पाणी मिळणे सोपे होणार आहे.

या स्थानकांवर बसवणार यंत्र

मुंबईच्या मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,ठाणे,दादर,कुर्ला आणि घाटकोपर या पाच रेल्वे स्टेशन्सवर हवेतून पाणी तयार करणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनवरील वाढती गर्दी लक्षात घेता स्टेशनवर देखील पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांवर ही सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः आता विमान प्रवास होणार स्वस्त, केंद्र सरकारच्या निर्णयाचा होणार फायदा)

मेघदूत नावाची यंत्रणा

हवेतून पाणी देणा-या या यंत्राचे नाव मेघदूत असे असणार आहे. सांद्रीभवन शास्त्राचा वापर करुन हे यंत्र सभोवतालच्या हवेतून पाणी मिळवणार आहे. या आधुनिक उपकरणाला एडब्ल्यूजी असेही म्हटले जाते. संयुक्त राष्ट्र संघाने देखील या यंत्राला मान्यता दिली आहे. ठाण्यात चार तर कुर्ला,दादर,घाटकोपर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रत्येकी एक अशाप्रकारे ही यंत्र बसवण्यात येणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.