Solapur Airport चे लवकरच ‘टेक ऑफ’

डीजीसीए परवाना आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश

208
Solapur Airport चे लवकरच ‘टेक ऑफ’
  • प्रतिनिधी

बहुप्रतिक्षित सोलापूर विमानतळावरून (Solapur Airport) लवकरच हवाई वाहतूक सुरू होणार असून विमानतळासाठी आवश्यक असलेला डीजीसीए परवाना आणि तांत्रिक प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिले आहेत. हवाई वाहतुकीच्या अनुषंगाने आवश्यक असलेली कामे विमानतळावर युद्धपातळीवर सुरू असून सोलापुरकरांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.

(हेही वाचा – Earthquake: अफगाणिस्तानच्या भूकंपाने राजधानी दिल्ली हादरली!)

सोलापूर विमानतळाबाबतच्या (Solapur Airport) विविध विषयांसंदर्भात गुरुवारी नवी दिल्लीत मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या अध्यक्षतेखाली नागरी हवाई वाहतूक मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली, त्यात हे निर्देश देण्यात आले. या बैठकीस भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. सुरेश, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, डॉ. शरद कुमार यांच्यासह अक्सा आणि इंडिगो कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

(हेही वाचा – काँग्रेसच्या सर्वेमध्ये Shiv Sena UBT तिसऱ्या स्थानावर; याचा नेमका अर्थ काय?)

याबद्दल अधिक माहिती देताना मोहोळ (Murlidhar Mohol) म्हणाले, ‘उडान-आरसीएसच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सोलापूर विमानतळासाठी ५० कोटींची विविध विकासकामे झाली आहेत. शिवाय सोलापूर विमानतळासाठी (Solapur Airport) आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाचे प्रशिक्षण सुरु असून ते लवकरच सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे ‘डीजीसीए’ (नागरी विमानन महानिदेशालय) च्या परवान्यासाठी आणि तांत्रिक बाबींच्या लवकरात लवकर पूर्ततेसाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत’, असेही मोहोळ म्हणाले.

(हेही वाचा – Jharkhand Assembly Election : चंपाई सोरेन भाजपाला मिळालेली सुवर्णसंधी)

विमान कंपन्यांशीही बोलणीला सुरुवात !

सोलापूरहून देशाच्या विविध ठिकाणी जाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यासह मोहोळ यांनी पुढाकार घेतला असून सोलापूर-तिरुपती, सोलापूर-दिल्ली, सोलापूर-हैद्राबाद या सेवा सुरु करण्यासंदर्भातही मोहोळ यांनी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत सकारात्मक चर्चा केली. (Solapur Airport)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.