पुण्यातून दिल्लीसह उत्तर भागातील राजकोट, प्रयागराज, अहमदाबाद ही विमान उड्डाणे (Air Travel) रद्द झाली आहेत, तर दक्षिणेकडील चेन्नईकडे जाणारे एक विमान रद्द झाले आहे, अशा मिळून एकूण ६ विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. ढगाळ हवामानामुळे सातत्याने विमान उड्डाणे रद्द होत असल्याने प्रवाशांची चांगलीच कसरत होत आहे. उत्तर भागातील हवामान दिवसेंदिवस ढगाळ होत आहे. त्यामुळे पुण्यातून दिल्लीकडे होणारी विमान उड्डाणे सातत्याने रद्द केली जात आहे.
परिणामी, प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रविवारी, अशीच स्थिती निर्माण झाली. परिणामी, 6 विमान उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे सुमारे सहाशेच्या घरात प्रवाशांचा नियोजित प्रवास शुक्रवारी थांबला. त्यांची नियोजित कामे होऊ शकली नाहीत. यामुळे विमान प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(हेही वाचा – Pune Municipality: पुणे – महापालिका उभारणार इको फ्रेंडली सिटी सेंटर)
मागील तीन आठवड्यापूर्वी खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, लखनऊ, हैदराबाद, अमृतसर, गोवा या ठिकाणांसाठी होणारी नऊ विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तत्पूर्वी मिचाँग वादळामुळे 14 विमाने रद्द झाली होती. त्यानंतर पुन्हा आठ विमाने रद्द झाली आणि आता पुन्हा 6 विमाने रद्द झाली आहेत. यामुळे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community