आता विमान प्रवास महागणार; या तारखेपासून सरकारचा शुल्कवाढीचा निर्णय

देशांतर्गत हवाई प्रवास येत्या काळात महागणार आहे. देशातील काही छोट्या शहरांसाठी असलेल्या विमानांच्या भाड्यात वाढ होणार आहे. सरकारने प्रादेशिक फ्लाइट्सवरील कनेक्टिव्हिटी शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क प्रति फ्लाईट आकारण्यात येणार आहे. त्यामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढणार आहे. येत्या काळात तुम्ही देशांतर्गत प्रवास करणार असाल, तर तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. तुमचे तिकीट किती महागणार आहे, याबाद्दल जाणून घेऊयात.

( हेही वाचा: भारत 2027 ला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार )

सरकार प्रादेशिक हवाई संपर्क शुल्क वाढवणार

सरकार प्रमुख मार्गांवर उड्डाण सेवा चालवणा-या एअर लाईन्सकडून आकारले जाणारे प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी शुल्क प्रतिफ्लाइट 10 हजार रुपयांनी वाढवणार आहे. हे सुधारित शुल्क 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. त्यामुळे जानेवारीपासून विमान प्रवास महागणार आहे. एका अधिसूचनेत याबाबत माहिती देण्यात आली आहे. सध्या हे शुल्क प्रति फ्लाइट 5 हजार रुपये असून ते पुढच्या वर्षी 1 एप्रिलपर्यंत 15 हजार रुपये होईल. त्यामुळे आता लवकरच विमान प्रवास महागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here