देशातील आणखी एका विमान कंपनीविरुद्ध (Airline crisis) दिवाळखोरी प्रक्रियेची सुनावणी होणार आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल पुढील आठवड्यात स्पाईसजेट कंपनीच्या कर्जदात्याने दाखल केलेल्या दिवाळखोरीच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. स्पाइसजेटविरोधातील दिवाळखोरीच्या याचिकेवर एनसीएलटीमध्ये ८ मे रोजी सुनावणी होणार आहे.
(हेही वाचा – तीन दशकांत २७ हवाई कंपन्यांना उतरती कळा)
स्पाईसजेटला कर्ज देणारी (Airline crisis) कंपनी एअरक्राफ्ट लेसर एअरकॅसल (आयर्लंड) लिमिटेड या कंपनीने दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी एनसीएलटी कडे अर्ज दाखल केला आहे. २८ एप्रिल रोजी हा अर्ज त्यांच्याकडून दाखल करण्यात आला होता. एनसीएलटीच्या (Airline crisis) वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, न्यायाधिकरणाचं मुख्य खंडपीठ या अर्जावर ८ मे रोजी सुनावणी करणार आहे.
हेही पहा –
यापूर्वी, गो फर्स्ट (Airline crisis) या वाडिया समूहाच्या मालकीच्या विमान कंपनीनं स्वतः दिवाळखोरी निवारण प्रक्रिया सुरू करण्यासाठी एनसीएलटीकडे अर्ज दाखल केला होता. आर्थिक संकटात सापडल्यानंतर गो फर्स्टनं हा अर्ज दाखल केला. या प्रकरणी सुनावणी घेतल्यानंतर एनसीएलटीनं आपला निर्णय राखून ठेवला आहे.
स्पाइसजेटचे प्रवक्ते काय म्हणाले?
दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यावर, स्पाईसजेटच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, “या घटनाक्रमाचा एअरलाईन्सच्या (Airline crisis) कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. एका निवेदनात प्रवक्त्यानं आशा व्यक्त केली की, हा मुद्दा न्यायालयाबाहेर सोडवला जाईल. यासोबतच ते म्हणाले की, सध्या या कर्जदात्याचं कोणतंही विमान एअरलाईन्सच्या ताफ्यात समाविष्ट नाही. या विमान लीजिंग फर्मची सर्व विमानं आधीच परत केली गेली आहेत.”
Join Our WhatsApp Community