Airline Hoax Threats : खोट्या धमक्यांमुळे विमान कंपन्यांचं होतंय एवढं नुकसान

Airline Hoax Threats : मागच्या काही दिवसांतच ६ विमांनांमध्ये बाँब ठेवल्याचे चुकीचे संदेश विमान कंपन्यांना आले आहेत. 

44
Airline Hoax Threats : खोट्या धमक्यांमुळे विमान कंपन्यांचं होतंय एवढं नुकसान
  • ऋजुता लुकतुके

या आठवड्यात विमान कंपन्यांना विमानात बाँब ठेवल्याचे खोटे संदेश पाठवण्याचा प्रकार वाढला आहे. ७ दिवसांत अशा ६ प्रकरणांची नोंद झाली आहे. काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी त्वरित कारवाई करत चोरांना पकडलंही आहे. पण, या प्रकारामुळे विमान कंपन्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. काही वेळा विमान दुसरीकडे वळवालं लागलं आहे. तर काहीवेळा विमान उड्डाण लांबलं आहे. अशा प्रत्येक वेळी कंपनीला सरासरी १५ ते १७ लाख रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे. (Airline Hoax Threats)

‘विमान दुसरीकडे वळवावं लागलं तर नेमकं किती नुकसान होतं हे विविध घटकांवर अवलंबून असतं. यात विमान फेरीचं अंतर, लागणारं इंधन, प्रवाशांची संख्या, सामानाचं वजन, विमानतळावर द्यावी लागणारी विविध भाडी आणि लॉजिस्टिक्सचे खर्च असे अनेक खर्च नव्याने उभे राहतात. त्यामुळे एकदा विमान दुसरीकडे वळवलं तर विमान कंपनीला सरासरी १४ ते १७ लाख रुपयांचा भूर्दंड पडू शकतो. आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी हा खर्च पाचपट जास्त असतो,’ असं विमान कंपनीच्या एका प्रवक्त्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं. या व्यक्तीने आपलं नाव उघड करण्याचं टाळलं. पण, त्याने दिलेले आकडे नक्कीच गंभीर आहेत. (Airline Hoax Threats)

(हेही वाचा – Ind vs NZ, 1st Test : ४६ धावांच्या नीच्चांकावर ऑस्ट्रेलियाने भारताला असं डिवचलं)

एकदा उड्डाण लांबलं तर त्याचा परिणान इतर गोष्टींवरही होतो. कंपनीच्या इतर उड्डाणांचं वेळापत्रकही बिघडू शकतं. कर्मचारी व्यवस्थापनही कोलमडतं. यातच विमान आंतरराष्ट्रीय प्रवास करणार असेल तर इतर देशा बाहेरच्या विमानतळांची परवानगी आणि इतर मुद्दे आणखी त्रासदायक ठरतात. (Airline Hoax Threats)

सध्या भारतात खोट्या धमकीच्या ईमेलमुळे सहा विमानांचं उड्डाण असं रोखून धरावं लागलं. १६ ऑक्टोबरला एका मोठ्या घटनेत एअर इंडियाचं दिल्ली ते शिकागो विमान कॅनडामध्ये इक्वेलिट या छोट्याशा गावात उतरवावं लागलं. प्रवाशांची सोय करण्यापासून ते शिकागो पर्यंतची पर्यायी व्यवस्था असा सगळा भूर्दंड कंपनीला पडला. इंडिगो कंपनीचं दमण ते लखनौ विमान असंच जयपूरला उतरवण्यात आलं.  एअर इंडियाचं मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारं विमान अर्ध्या रस्त्यातून दिल्लीत परत आणण्यात आलं. एका तरुणाने आपल्या सोशल मीडिया खात्यावर स्पाईसजेटच्या दोन विमानांबद्दल चुकीची माहिती दिली होती. या विमानांमध्ये बाँब असल्याचं त्याने लिहिलं होतं. हा व्यक्ती अजून पोलिसांना सापडला नसून ते त्याचा तपास करत आहेत. (Airline Hoax Threats)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.