बहुप्रतिक्षित असलेली नांदेडची विमानसेवा रविवार, (३१ मार्च २०२४) सुरू होणार आहे. रविवारपासून दररोज नांदेड ते बंगळुरू, नांदेड-दिल्ली-जालंदर तसेच आठवड्यातून काही दिवस नांदेड-हैद्राबाद व नांदेड ते अहमदाबाद ही विमानसेवा सुरू होणार आहे. (Nanded Airlines)
२०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड विमानतळावरुन ‘उडे देश का हर आदमी’या योजनेतंर्गत विमानसेवेचा प्रारंभ केला होता. काही दिवस ही विमानसेवा सुरू होती आणि नंतर बंद पडली. मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्र शासन व खाजगी संस्था यांच्यामध्ये समन्वय नसल्याने विमानतळावरील सुरक्षा, विद्युत व अन्य सेवेचा बोजवारा उडाला होता. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा नांदेडला ठरल्यानंतर कामकाजाला वेग आला.
(हेही वाचा – Mumbai Slums Free : बाळासाहेबांच्या नातवाला नकोय झोपडपट्टीमुक्त मुंबई )
बुकिंग १५ दिवसांपासून सुरू
नांदेड विमानतळावरील सेवा व दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले तसेच नाईट लँडिंगचीही व्यवस्था करण्यात आली. नंतरच्या काळात काही कंपन्यांनी विमानसेवा सुरू करण्यात रस दाखवला. त्यात स्टार एअरने सर्व्हेक्षण केले. सुरुवातीला नांदेड ते पुणे ही विमानसेवा सुरू होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र पुणे विमानतळावर जागा मिळत नसल्याने ही विमानसेवा बासनात पडली होती. आता स्टार एअरने रविवारी ३१ मार्चपासून दररोज नांदेड ते बंगळुरू, नांदेड-दिल्ली-जालंदर ही विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचे बुकिंग १५ दिवसांपासून सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community