Airtel ग्राहकांना मोठा धक्का, कंपनीने 57 टक्क्यांनी वाढवले रिचार्जचे दर

देशातील आघाडीची मानली जाणाकी टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एअरटेलने आपल्या मिनिमम रिचार्जच्या दरांत तब्बल 57 टक्क्यांनी वाढ केली असून, आता या रिचार्जसाठी ग्राहकांना 99 रुपयांऐवजी तब्बल 155 रुपये मोजावे लागणार आहेत. सध्यातही ही दरवाढ हरियाणा आणि ओडिशा या दोन राज्यांत करण्यात आली असून, हळूहळू ती संपूर्म देशात लागू होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

155 रुपयांचा नवा प्लॅन

एअरटेलने हरियाणा आणि ओडिशा सर्कलमध्ये 99 रुपयांचा मिनिमम रिचार्ज बंद केल्याचे वृत्त पीटीआयकडून देण्यात आले आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये 200 एमबीच्या डेटासह कॉल रेट 2.5 पैसे प्रति सेकंद होता. आता 155 रुपयांच्या या नवीन प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 1 जीबी डेटासह 300 एसएमएस फ्री मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा प्रयोग कंपनीने मार्केटिंग टेस्टिंगसाठी केला असून त्याला चांगला प्रतिसाद न मिळाल्यास 99 रुपयांचा प्लॅन पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

(हेही वाचाः T-20 World Cup 2024 मध्ये येणार मोठा ट्विस्ट, फॉरमॅटमध्ये ‘असा’ होणार बदल)

5जी चा 4जी ला फटका?

देशात 5जी नेटवर्किंग सेवा सुरू केल्यामुळे अनेक टेलिकॉम कंपन्यांकडून आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचा फटका आता 4जी ग्राहकांना बसत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षीही एअरटेलने काही निवडक सर्कलमध्ये कमीत कमी रिचार्जच्या किंमती 79 रुपयांवरुन 99 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. त्यात आता कंपनीने हे दर 155 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here