‘पगारवाढ’हा नुसता शब्द सुद्धा अनेकांचा आनंद द्विगुणीत करतो. काम करणा-या प्रत्येकालाच पगारवाढीची अपेक्षा असते. याचा विचार करत विमान कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांचे पगार 20 ते 25 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या विमान कंपन्यांतील कर्मचारी ‘हवेत’ असल्याचे पहायला मिळत आहे.
कोरोना नंतर विमान कंपन्यांचे उत्पन्न ‘ढगात’
कोरोना काळातील निर्बंधांमुळे देशभरातील विमान कंपन्यांची वाहतूक ठप्प झाली होती. पण आता निर्बंध शिथिल केल्यामुळे विमान वाहतूक कंपन्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. सरकारकडून मर्यादित आसन क्षमतेचे निर्बंध हटवण्यात आल्यामुळे आता विमान कंपन्यांची गाडी हळूहळू रुळावर यायला सुरुवात झाली आहे. याचा फायदा होऊन विमान कंपन्यांचे उत्पन्न देखील गगनाला भिडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच एअर इंडियाकडून कर्मचा-यांचे पगार टप्प्याटप्प्याने वाढवायला सुरुवात केली आहे.
(हेही वाचाः ‘या’ नागरिकांनी मास्क वापरावेत, कोरोना नियंत्रणासाठी आरोग्यमंत्र्यांचं आवाहन)
अशी झाली आहे पगारवाढ
एअर इंडियाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोना विस्फोटानंतर वैमानिकांचा उड्डाण भत्ता, विशेष भत्ता अनुक्रमे आणि वाइड बॉडी भत्ता 35, 40 आणि 45 टक्क्यांनी करण्यात आला होता. मात्र 1 एप्रिल 2022 पासून या तिन्ही भत्त्यांमध्ये अनुक्रमे 20, 25 आणि 25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तसेच विमानाच्या केबिन क्रूमधील कर्मचा-यांच्या उड्डाण भत्त्यात केलेली कपातही 25 टक्क्यांनी वाढवल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एअर इंडियातील कर्मचा-यांच्या पगाराचे आकडे चांगलेच वाढले आहेत.
(हेही वाचाः केवळ बारा मिनिटांत ‘असा’ मिळवा मालमत्तेचा ‘सातबारा’)
Join Our WhatsApp Community