बहुचर्चित पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय सोमवारी दिल्लीच्या लोकनायक भवनात ईडीसमोर हजर होणार आहे. ईडीने ऐश्वर्याला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते. पनामा पेपर्स प्रकरणाचा तपास बराच काळ सुरू आहे, या प्रकरणात अभिषेक बच्चनचीही चौकशी करण्यात आली. या पनामा पेपर्स लीक प्रकरणात सिने सृष्टीतील अनेक तारकांची आणि उद्योगपतींसह ५०० भारतीयांची नावे आहेत.
ईडीचा तपास सुरु
या पनामा पेपर लीक प्रकरणात अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यासह अनेक भारतीय सेलिब्रिटींची नावे होती. सर्व लोकांवर कर चुकवल्याचे आरोप होते. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अमिताभ यांनी भारतीय नियमांनुसारच, परदेशात पैसे पाठवले असल्याचे सांगितले होते. पनामा पेपर्समध्ये दाखविलेल्या कंपन्यांशी संबंध नसल्याचाही त्यांनी दावा केला होता.
( हेही वाचा :ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या आधीच इतका अमली पदार्थांचा साठा जप्त )
काय प्रकरण होते
3 एप्रिल 2016 रोजी मॉसॅक फोन्सेका या पनामा येथील लॉ फर्मचा 40 वर्ष जुना डेटा लीक झाला होता. जगभरातील श्रीमंत आणि प्रभावशाली लोक कर वाचवण्यासाठी ऑफ-शोअर कंपन्यांमध्ये पैसे गुंतवत असल्याचे उघड झाले. अशा प्रकारे कर चोरी आणि मनी लाँड्रिंग मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे तेव्हा उघड झाले. या कागदपत्रांमध्ये सिनेतारक आणि उद्योगपतींसह ५०० भारतीयांची नावे आहेत. यामध्ये बच्चन कुटुंबाचेही नाव आहे,
यापूर्वीच समन्स बजावण्यात आले
ऐश्वर्या राय बच्चनला यापूर्वी समन्स बजावण्यात आले होते, तिला १५ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले होते, परंतु ऐश्वर्या राय बच्चनने आपले उत्तर ईडीला ईमेलद्वारे पाठवले. यानंतर तिला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आता समन्स बजावल्यानंतर ऐश्वर्या आज दिल्लीत पोहोचते का हे पाहावे लागेल.
Join Our WhatsApp Community