एसटी कामगारांकडून पैसे गोळा केल्याप्रकरणी आणखी दोघे अटकेत

130
राज्य परिवहन महामंडळाचे संपकरी कामगारांचे नेतृत्व करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील, तसेच औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि प्रफुल्ल गावंडे यांच्याविरोधात अकोट शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३०० ते ४०० रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तब्बल ७४ हजार कर्मचाऱ्यांना फसवल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे. इतकेच नाही तर त्यांनी न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी पैसे गोळा केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे.

३ कोटी गोळ्या केले असल्याचा इशारा 

आज या प्रकरणातील आरोपी औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि बस वाहक प्रफुल गावंडे यांना अकोला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांच्या तक्रारीनंतर अकोट शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात मालोकार यांनी अकोट पोलीस ठाण्याला तक्रार दिली होती. त्यानंतर ११ एप्रिल रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संपकरी कर्मचाऱ्यांना निलंबित व बदली करण्याचे आदेश राज्य परिवहन प्रशासनाने काढले. त्यातून सुटका व्हावी व आपल्यावरील उपरोक कार्यवाही रद्द व्हावी या करीता कर्मचाऱ्यांमार्फत प्रयत्न सुरु झाले होते. कर्मचाऱ्यांच्या या अडचणींचा गैरफायदा घेऊन अजयकुमार बहादरसिंग गुजर आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात प्रकरण दाखल करून प्रशासनाद्वारे होत असलेली उपरोक्त कार्यवाही रद्द करुन देतो, अशा खोट्या भुलथापा देऊन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३०० ते ५०० रुपये जमा केले, असा त्यांच्यावर आरोप आहे. यामध्ये राज्यभरातील जवळपास ७० हजार एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेली रक्कम ३ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.