Nashik मध्ये पुस्तकाचं हॉटेल चालविणाऱ्या आजीबाईंना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

99

Nashik मध्ये वाचन संस्कृती वाढावी म्हणून ७५ वर्षीय आजीबाईंनी कौतुकास्पद प्रयत्न केला आहे. हॉटेलमधील प्रत्येक टेबलावर मेनू कार्डसोबत पुस्तक वाचनाचा आनंद येथील ग्राहकांना घेता येतो. चार पुस्तकांपासून सुरू झालेल्या या हॉटेलमध्ये आता वेगवेगळ्या विषयांची तब्बल सहा ते सात हजार पुस्तके आहेत. दरम्यान या हॉटेलची (Hotel) सध्या राज्यभर चर्चा सुरू असून, हा हॉटेल चालविणाऱ्या आजीबाईनां राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. (Nashik)

नाशिकमधल्या भीमाबाई जोंधळे (Nashik Bhimabai Jondhale) या आजीबाईंनी ‘पुस्तकाचे हॉटेल’ (Pustakanch Hotel) सुरू केले आहे. त्यांच्या या अभिनव हॉटेलमध्ये विविध वाङ्‌मयीन प्रकारातील सुमारे सहा ते सात हजार पुस्तके उपलब्ध आहेत. या पुरस्काराचे वितरण गुरुवारी मुंबईत होत आहे. 

स्वादिष्ट पिठलं भाकरी सोबत आजींच्या पुस्तकांच्या मेजवनीची सर्वत्र चर्चा आहे. नाशिकपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर 74 वर्षीय ‘भिमाबाई जोंधळे’ यांच ‘पुस्तकाचं हॉटेल’ आहे. या आगळ्यावेगळ्या हॉटेलच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढावी यासाठी त्यांनी नवीन पिढीसमोर आदर्श ठेवला आहे. या ठिकाणी खवय्यांना पोटाची भूक भागवण्यासोबत त्यांच्या ज्ञानाची ही भूक त्या भागवतात.

(हेही वाचा – Marathi Bhasha Gaurav Din 2025 : २७ फेब्रुवारी : मराठी भाषा गौरव दिन की मराठी राजभाषा दिन?)

चहाचा व्यवसाय पोहचला हॉटेलपर्यंत
भीमाबाई यांना बालपणापासूनच शिक्षणाची आवड होती. त्यांचं पाचवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं आणि त्यावेळच्या रुढीप्रमाणे लहान वयातच लग्न झालं. कौटुंबिक संघर्ष करत जिद्दीने त्यांनी आपल्या संसाराचा गाडा ओढला. 1972 च्या दुष्काळानंतर घराची आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळं जोंधळे आजींनी मोलमजुरी करून घराला हातभार लावला. आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं. 2010 च्या सुमारास चहाची टपरी सुरू केली. त्यावेळी त्या चहाच्या टपरीवर वर्तमानपत्र ठेवायच्या, वाचन चळवळ, संस्कृती युवा पिढीमध्ये रुजावी हा त्यांचा मुख्य उद्देश होता. काष्टातून त्यांचा चहाचा व्यवसाय हॉटेलपर्यंत पोहोचला. आत्तापर्यंत तुम्ही हॉटेलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थांचे मेन्यू पाहिले असतील. मात्र नाशिक जवळ असं एक हॉटेल आहे, ज्या हॉटेलमध्ये तुम्हाला चमचमीत जेवणासोबतच चक्क पुस्तकांची देखील मेजवानी उपलब्ध आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.