Ajit Pawar : पर्यटनाला घराबाहेर पडू नका, कुटुंबाची काळजी घ्या – अजित पवार

134
लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाची चिंता; Ajit Pawar काय म्हणाले?

राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होत असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. नदी, नाले, ओढे, धरण, पूरस्थिती असलेल्या सखल भागात जाणे टाळावे. डोंगर, टेकड्या, दऱ्या, धबधब्यांसारख्या ठिकाणी पुराचे पाणी अचानक वाढणे, निसरड्या वाटेवर पाय घसरुन अपघात होण्यासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी सद्यंस्थितीत पर्यटनासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. (Ajit Pawar)

(हेही वाचा – NEET UG 2024 च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! सुधारित अंतिम निकाल जाहीर; ‘या’ लिंकवर पहा! )

दरडप्रवण, पूरग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. प्रशासनाच्या संपर्कात रहावे आणि त्यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना, आवाहनांचे पालन करावे. स्वत:सह कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले आहे. (Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.