उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सध्या पुणे दौरा सुरू आहे. त्यावेळी दहीहंडी, गणेशोत्सव यावर त्यांनी पुणे महापालिका प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत. गणपतीत पुणे मेट्रो (Pune Metro) रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवा. गणेश मंडळांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे सर्व मिरवणुका वेळेत काढण्यासाठी प्रयत्न असेल. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी, (२८ ऑगस्ट ) पुण्यातील बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांची संवाद साधताना दिली.
हडपसर येथे सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते १०६ फुटी ध्वजाचे लोकार्पण करण्यात आले. तेव्हा ते बोलत होते पुढे बोलताना पवार म्हणाले की, ७ तारखेला दहीहंडीचा उत्सव आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत. गोविंदांना विम्याचे कवच आम्ही दिले आहे. गणेश मंडळांशी सकारात्मक चर्चा झाली. मिरवणुका वेळेत पूर्व व्हाव्यात यासाठी मंडळांना सुचना केल्या आहेत. दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक ४:३० वाजता काढण्यास सांगितलं आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. पुण्यात परदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे बारकाईने काळजी घेण्यासाठी पोलिस तयार आहेत. मेट्रो रात्री बारावाजेपर्यंत सुरु ठेवली जाणार आहे. विशेषत: पाचव्या आणि दहाव्या दिवशी ही सेवा बारा वाजेपर्यंत सुरु राहील. गणेश मंडळांना एकदा परवानगी घेतल्यास पुन्हा पाच वर्ष परवानगी घ्यायला लागणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा : Conjunctivitis Patient : राज्यात डोळ्यांच्या साथीमुळे रुग्णांची संख्या पाच लाखांपर्यंत)
आठवड्याला बैठक घेण्याची पवारांनी दिली करणे
पुण्यात अजित पवारांनी दर आठवड्याला बैठक घेण्याबाबतचे कारण सांगितलं आहे. ते म्हणाले मी बैठक घेतल्यावर मला वाटत की त्याचे परिणाम ७ दिवस राहतील. म्हणून दर आठवड्याला बैठक घेतो. पण काहींना वाटत की त्यांच्या बैठकीचा परिणाम एक दोन महिने राहील म्हणून ते एक दोन महिन्यांनी बैठक घेतात. शिंदे फडणवीसांबरोबर मी खेळीमेळीत काम करतो. काहींना माझी भूमिका पटते तर काहींना पटत नाही. ज्यांना पटत नाही ते माझ्यावर टीका करतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community