अजित पवारांनी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना झापले!

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयातील नुतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करुन केलेल्या कामाची पाहणी केली.

142

पुण्यातील पोलिस मुख्यालयात करण्यात आलेल्या बांधकामावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी, ११ जून रोजी पवार सकाळीच पोलिस मुख्यालयात पोहचले. त्या वेळी कामाचा दर्जा पाहून ते नाराज झाले. मुख्यालयाचे काम अगदी छा-छू झाले आहे. ही पोलिसांची अवस्था असेल, तर बाकीच्या कामांचे काय? मी चांगले असेल तर कौतुक करतो, खराब असेल तर दाखवून देतो, अजित पवार यांनी पोलिस मुख्यालयात फिरून बांधकामातील त्रुटी दाखवून दिल्या. तसेच अधिकाऱ्यांना या सर्व त्रुटी सुधारण्याच्या सूचनाही दिल्या, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्त अमिताभ गुप्ता यांना चांगलेच झापले.

कोरोनाने मृत्यू कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नेमणूक पत्रही प्रदान

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयातील नुतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करुन केलेल्या कामाची पाहणी केली. शिवाय कोरोना काळात पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. तसेच या काळात ज्यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला, त्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पोलिस दलात नेमणूकीचे पत्रही त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कर्तव्यावर असताना कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झालेल्या अंमलदाराच्या तीन पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तपत्र देवून पोलिस दलात नेमणूक करण्यात आली. त्यामध्ये सामेश संतोष म्हेत्रे, अभिजीत आनंद गायकवाड, प्रसाद दिलीप वावरे यांचा समावेश आहे.

(हेही वाचा : म्युकरमायकोसिसचे ‘अ‍ॅम्फोटेरसीन-बी’ आयात करा! उच्च न्यायालयाची सूचना )

या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोरोनाच्या काळात चागंली कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरव करण्यात आला. त्यामध्ये पोलिस निरीक्षक विजय पुराणिक, पोलिस उपनिरीक्षक गौरव देव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास टिळेकर, पोलिस नाईक, उत्तम गाडे, गौरव कांबळे, शिपाई रेणुका भांगरे यांचा समावेश आहे. दरम्यान पोलिस मुख्यालय शिवाजीनगर येथील नुतनीकरणच्या वेळी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटदार यांना प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरव करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.