उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दि. १० मार्च २०२५ रोजी राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती (Maha Yuti) सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. शेषराव वानखेडेंनंतर (Sheshrao Wankhede) अजित पवार (Ajit Pawar) सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करत आहेत. शेषराव वानखेडे (Sheshrao Wankhede) यांनी १३ वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. तर अजित पवार (Ajit Pawar) ११ वेळा अर्थसंकल्प सादर करणारे दुसरे अर्थमंत्री ठरणार आहेत. त्यामुळे २०२८ ला अजित पवार शेषराव वानखेडेंचा (Sheshrao Wankhede) विक्रम मोडतील. कारण २०२८ ला अजित पवार महायुती सरकारचा चौथा आणि स्वत:चा १४ वा अर्थसंकल्प मांडतील.
( हेही वाचा : Gudhi Padwa Wishes : गुढीपाडव्याच्या शुभेच्छा कोणत्या शब्दांत द्याल?)
दरम्यान अजित पवारांनंतर (Ajit Pawar) सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील (Jayant Patil) (१० वेळा) आणि सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) (९ वेळा) यांना जातो. शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. २०२१ चा अर्थसंकल्प ८ मार्च जागतिक महिला दिनी जाहीर करताना त्यांनी तो राज्यातील महिला शक्तीला समर्पित केला होता. २०२२ चा अर्थसंकल्प स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनी ११ मार्च रोजी सादर केला होता. तो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, समर्पण, स्वराज्यनिष्ठेला समर्पित होता. कृषी, उद्योग, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास या पंचसूत्रीवर आधारीत अर्थसंकल्पही त्यांनी सादर केला आहे. मागील वर्षीचा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प सर्वसमावेशक, क्रांतीकारी अर्थसंकल्प होता. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यात त्या अर्थसंकल्पातील लोकोपयोगी, लोकप्रिय निर्णयांचा महत्वाचा वाटा होता. उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेला अनेक अपेक्षा असून अजित पवार (Ajit Pawar) त्या अपेक्षांवर खरे उतरतील, हा विश्वासही जनतेच्या मनात आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community