२३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी; अजमेर पोलिसांनी Bangladeshi infiltrators मोहम्मद शाहिदला केली अटक

29
२३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी; अजमेर पोलिसांनी Bangladeshi infiltrators मोहम्मद शाहिदला केली अटक
२३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी; अजमेर पोलिसांनी Bangladeshi infiltrators मोहम्मद शाहिदला केली अटक

राजस्थान (Rajasthan) पोलिसांनी अजमेर येथून ४० वर्षीय मोहम्मद शाहिद (Mohammad Shahid) नावाच्या बांगलादेशी घुसखोराला अटक केली आहे. शाहिदने २३ वर्षांपूर्वी वयाच्या १७ व्या वर्षी बांगलादेशातील हिली येथून बेकायदेशीरपणे पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला होता. तो काही दिवस मालदा (Malda) येथे राहिला आणि तिथून दिल्लीला (Delhi) आला. दिल्लीहून (Delhi) तो अजमेरला गेला. तेव्हापासून तो तिथेच राहत होता. तो बांगलादेशातील निफामारी जिल्हा सैदपूर गावचा रहिवासी आहे. (Bangladeshi infiltrators )

( हेही वाचा : Congress ची ७०० कोटींची मालमत्ता ईडी जप्त करणार; नॅशनल हेराल्ड प्रकरण पुन्हा चर्चेत

अजमेरच्या पोलिस अधीक्षक वंदिता राणा यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi infiltrators ) पकडण्यासाठी राबवण्यात आलेल्या कारवाईत शाहिदला (Mohammad Shahid) पकडण्यात आले. यापूर्वी, पोलिसांच्या पथकाने २० बांगलादेशींना पकडले होते. पोलिसांनी बेकायदेशीर घुसखोरांची ओळख पटविण्यासाठी जालियन स्मशानभूमी, अंदकोट, नई सडक, तारागड हिल (Taragad Hill) , सोहल खांभा दर्गा आणि इतर संशयित भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे. (Bangladeshi infiltrators)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.