Ajmer sex scandal : पॉक्सो न्यायालयाने 32 वर्षांनंतर सहा वासनांध मुसलमान आरोपींना सुनावली जन्मठेपेची शिक्षा

न्यायालयाने प्रत्येक दोषींना ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे

146

राजस्थानच्या विशेष न्यायालयाने 20 ऑगस्ट रोजी 1992 च्या अजमेर सेक्स स्कँडल (Ajmer sex scandal) प्रकरणी सहा जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यात 11 ते 20 वयोगटातील 100 हून अधिक शालेय आणि महाविद्यालयीन मुलींवर सामूहिक बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता.

नफीस चिश्ती, नसीम उर्फ टारझन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहेल गनी आणि सय्यद जमीर हुसैन अशी आरोप सिद्ध झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी अजमेरमधील शाळा आणि महाविद्यालयातील मुलींशी मैत्री करायचे, त्यांचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करून एका दुर्गम फार्महाऊसमध्ये जाऊन लैंगिक अत्याचार करायचे. अशाच प्रकारे या टोळीच्या कचाट्यात अडकलेल्या मुलींना त्यांच्या मैत्रिणींनाही आणण्यासाठी ही टोळी जबरदस्ती करायची.

(हेही वाचा Badlapur School Case: बदलापूरच्या घटनेनंतर ‘त्या’ शाळेसंबंधी सरकार ने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय )

न्यायाधीश रंजन सिंह यांनी नमूद केले की, फिर्यादीच्या युक्तिवाद आणि परिस्थितीसह गुन्ह्याचे स्वरूप आणि गंभीरता लक्षात घेता, सहाही आरोपींना शिक्षा करणे योग्य आहे. न्यायालयाने प्रत्येक दोषींना ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. आरोपी नफीस उर्फ सय्यद नफीसुद्दीन, मोहम्मद इक्बाल अजमेरी, सलीम चिश्ती, सोहेल गनी आणि सय्यद जमीर हुसैन यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 120B, 376 अन्वये दोषी ठरवण्यात आले आहे आणि आरोपी नसीम उर्फ टारझनला कलम 120B, 376 नुसार दोषी ठरवण्यात आले आहे. (Ajmer sex scandal)

न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला पुढे निर्देश दिले की, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेंतर्गत खटल्यातील घटनांच्या संदर्भात पीडितांना कोणतीही रक्कम दिली गेली असेल, तर ती रक्कम न्यायालयाने दोषींना ठरवलेल्या दंडाच्या रकमेतून समायोजित करण्याचा आदेश दिला. यावेळी न्यायालयाने आरोपींच्या वारंवार अनुपस्थितीमुळे खटल्याला उशीर झाला, असेही न्यायालयाने नमूद केले. तपास तेव्हा सुरू झाला जेव्हा पहिला आरोपी नफीस चिश्ती हा 20.04.2003 रोजी हजर झाला आणि अंतिम आरोपी सोहेल गनी 17.02.2018 रोजी हजर झाल्यानंतरच तपास पूर्ण झाला. या प्रकरणातील 18 आरोपींपैकी आठ जणांना 1998 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.