मुंबई प्रतिनिधी:
Akash Fundkar : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे कामगार विभागाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील (Directorate of Industrial Safety and Health Recruitment) ‘सहायक संचालक, गट-ब’ या पदासाठी ४४ उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. या पैकी विहित अर्हताधारक ३२ उमेदवारांना २६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या आदेशानुसार नियुक्ती देण्यात आली. (Akash Fundkar)
(हेही वाचा – Bangladesh मध्ये पुन्हा हिंदू मंदिरावर हल्ला; धर्मांधाने बॉम्बस्फोट करत केली मूर्तीची तोडफोड)
काही उमेदवारांच्या अनुपस्थितीमुळे प्रतिक्षायादीतील उमेदवारांना संधी
नियुक्ती दिलेल्या काही उमेदवारांनी वैयक्तिक कारणांमुळे रुजू होण्यास नकार दिला, तर काहींनी “उप संचालक, गट-अ” या उच्च पदावर निवड झाल्याने ते त्या पदावर रुजू झाले. काही उमेदवारांनी विहित कालावधीत (मुदतवाढीसह) पदस्थापनेवर हजर राहिले नाहीत. त्यामुळे या उमेदवारांची नियुक्ती शासन स्तरावर रद्द करण्यात आली. या रिक्त जागांवर नियुक्तीसाठी शासनाने MPSC आयोगास प्रतिक्षायादीतील उमेदवारांची शिफारस करण्याची विनंती केली. त्यानुसार आयोगाने ४ नवीन उमेदवारांची शिफारस केली.
(हेही वाचा – पुतिन यांची काळजी करू नका; स्वतःच्या देशात काय चालले ते पहा; Donald Trump यांनी युरोपियन देशांना सुनावले)
कामगार मंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप
कामगार मंत्री अॅड. आकाश पांडुरंग फुंडकर (Labor Minister Adv. Akash Phundkar) यांनी या शिफारसप्राप्त उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याचे निर्देश दिले. नियुक्ती प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सोमवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी मंत्री महोदयांच्या हस्ते ४ उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आल्याने उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील सहायक संचालक पदे कार्यरत होणार असल्याने कामगार विभागातील प्रशासन अधिक बळकट होण्यास मदत होईल.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community