खलिस्तानवादी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannun) याने उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभादरम्यान हल्ला करणार असल्याची धमकी एका व्हिडिओद्वारे दिली आहे. मात्र पन्नूच्या या धमकीला न जुमानता आखाडा परिषदेने प्रत्युत्तर म्हणून कडक इशारा दिला आहे. यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे (Akhil Bharatiya Akhara Parishad ) अध्यक्ष महंत रवींद्र पुरी ( Mahant Ravindra Puri ) म्हणाले की, पन्नू सारख्या खलिस्तानवादी दहशतवाद्याने महाकुंभात शिरण्याचा प्रयत्न केला तर त्याला बदडवून बदडवून पळवून लावले जाईल, अशी स्पष्ट भूमिका पुरी यांनी घेतलीय. (Akhara Parishad)
( हेही वाचा : Boxing Day Test : ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही जेव्हा मैदानावरील वर्तणुकीसाठी दंड झाला होता…)
पुरी ( Mahant Ravindra Puri ) पुढे म्हणाले की, पन्नू सारख्या वेड्यांना आम्ही फारसे गांभीर्याने घेत नाही. असे शेकडो वेडे आपण पाहिलेत. हा तो महामेळा आहे, जिथे शीख आणि हिंदू सर्व एक आहेत. पन्नूने आमच्यात फूट पाडण्याबाबत केलेले विधान योग्य नाही. नागा साधूंप्रमाणे शीख समाजातही साधू आहेत. ते दोघेही सनातनचे सैनिक आहेत. त्यामुळे आम्ही पन्नू सारख्या वेड्यांना गांभीर्याने घेत नाही.” नुकताच पन्नूने एक व्हिडिओ जारी केला होता. ज्याद्वारे त्याने धमकी दिली होती की, महाकुंभादरम्यान तो खलिस्तानवादी दहशतवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेईल, ज्यांची पिलीभीतमध्ये नुकतीच चकमक झाली होती.(Akhara Parishad)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community