ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ‘रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखेकडून पुरस्करांची घोषणा

40
ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना 'रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार' जाहीर
ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना 'रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार' जाहीर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (Akhil Bharatiy Marathi Natya Parishad) बोरिवली शाखेतर्फे रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या रंगकर्मींसाठी वेगवेगळ्या विभागात पुरस्काराची घोषणा केली आहे. यामध्ये रंगभूमीवर दीर्घकाळ सेवा करून लोकादरास पात्र ठरलेल्या ज्येष्ठ रंगकर्मीसाठी दिला जाणारा उदय राजेशिर्के पुरस्कृत, कै. बळीराम कृष्णाजी राजेशिर्के स्मृती, ‘रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांना देण्यात येणार आहे. तसेच व्यावसायिक रंगभूमीवरील लक्षणीय कार्यासाठी, विश्वनाथ माने पुरस्कृत, कै. भागीरथी नारायणराव माने स्मृती ‘मच्छिंद्र कांबळी अभिरंगराज पुरस्कार’ अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) यांस देण्याचा जाहीर केले आहे.

याव्यतिरिक्त संगीत रंगभूमीवरील लक्षणीय कार्यासाठी, अशोक सराफ व सुभाष सराफ पुरस्कृत, कै. गोपिनाथ सावकार स्मृती, ‘गोपिनाथ सावकार स्वररंगराज पुरस्कार’ बकुळ पंडित (Bakul Pandit) यांना तर उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी, अर्चना नेवरेकर फाऊंडेशन पुरस्कृत, ‘रंगप्रतिभा पुरस्कार’ उषा नाईक (Usha Naik) यांना जाहिर झाला आहे. तरी दि. १ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अन्य पुरस्कार आणि पुरस्कार्थी

– लोकरंगभूमीवरील लक्षणीय कार्यासाठी ‘लोकरंग पुरस्कार’ – जयराज नायर

– हौशी समांतर प्रायोगिक रंगभूमीवरील लक्षणीय कार्यासाठी ‘रंगप्रयोग पुरस्कार’ – शीतल तळपदे

– नभोनाट्यातील लक्षणीय कार्यासाठी ‘स्वराभिनय गौरव पुरस्कार’ – सचिन सुरेश

– उत्कृष्ट नाट्यसंहिता लेखकासाठी ‘रंगसंहिता पुरस्कार’- चिन्मय मांडलेकर

– नाट्यसमीक्षा क्षेत्रातील कार्यासाठी ‘रंगसमीक्षा पुरस्कार’ – संजय कुलकर्णी

– अ. भा. मराठी नाट्य परिषद, बोरिवली शाखा निरलस कार्यकर्त्यांसाठी असलेला ‘कार्यरंग पुरस्कार’- सुरेश चव्हाण

– लक्षवेधी प्रायोगिक नाटकासाठी, ‘नाट्यरंग पुरस्कार’- प्रो एंटरटेनमेंट (नाटक -शुद्धता गॅरेंटेड ) प्रमोद शेलार

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.