Dr Tara Bhawalkar: अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड

41
Dr Tara Bhawalkar: अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड
Dr Tara Bhawalkar: अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड

लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक- संशोधक डॉ. तारा भवाळकर (Dr Tara Bhawalkar) यांची तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. दिल्लीत ७० वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर भवाळकर (Dr Tara Bhawalkar) यांना सन्मानाचे अध्यक्षपद मिळाले आहे. यासंदर्भातील माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दि. ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी दिली.

डॉ. तारा भवाळकर यांच्याविषयी

१ एप्रिल १९३९ रोजी जन्मलेल्या डॉ. तारा भवाळकर (Dr Tara Bhawalkar) या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. प्राध्याप्रक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि निवृत्त झाल्यावर पुण्यातील ललित कला अकॅडमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकॅडमीमध्ये अतिथी प्राध्यापक देखील होत्या. त्यांचा लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककलेविषयी लेखन आणि गाढा अभ्यास आहे.

डॉ. तारा भवाळकर (Dr Tara Bhawalkar) यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि स्त्री जाणिवांवर भाष्य करणारे लेखन केलेय. मराठी विश्वकोश, मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांचे योगदान आहे

डॉ. तारा भवाळकर (Dr Tara Bhawalkar) यांची प्रकाशित पुस्तके

तिसऱ्या बिंदूच्या शोधात
प्रियतमा
मरणात खरोखर जग जगते
मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे
मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद
यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा
लोकनागर रंगभूमी (माहितीपर)
लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.