98th Marathi Sahitya Sammelan : दिल्लीत भरणार सारस्वतांचा मेळा

164
98th Marathi Sahitya Sammelan : दिल्लीत भरणार सारस्वतांचा मेळा

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त (98th Marathi Sahitya Sammelan) राजधानी नवी दिल्लीत सारस्वतांचा मेळा जमणार आहे. तब्बल सत्तर वर्षांनंतर दिल्ली येथे साहित्य संमेलन घेण्याचा निर्धार मुंबई येथे रविवारी झालेल्या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. संजय नहार यांच्या सरहद या निमंत्रक संस्थेकडे महामंडळाने यजमानपद दिले आहे.

नवी दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियम मध्ये फेब्रुवारीअखेर अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे संमेलन होणार आहे. महामंडळाच्या निवड समिती सदस्यांनी नुकतीच इचलकरंजी, दिल्ली आणि मुंबई येथील स्थळांना भेटी दिल्या. निवड समितीने अहवाल सादर केल्यानंतर महामंडळ कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते नवी दिल्लीत संमेलन घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

(हेही वाचा – Delhi Hit and Run: रॅपिडोच्या बाईक रायडरला सरकारी अधिकाऱ्याने २ किमीपर्यंत फरफटत नेलं आणि…)

१९५४ साली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ यांच्या नेतृत्वात मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे संमेलन होणार आहे. महामंडळाच्या निवड समिती सदस्यांनी नुकतीच इचलकरंजी, नवी दिल्ली आणि मुंबई येथील स्थळांना भेटी दिल्या. निवड समितीने अहवाल सादर केल्यानंतर महामंडळ कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते नवी दिल्लीत संमेलन (98th Marathi Sahitya Sammelan) घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

१९५४ साली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे संमेलन घेण्यात आले होते. सत्तर वर्षानंतर हे संमेलन देशाच्या राजधानीत होत आहे. मराठीच्या दृष्टीने भारताच्या राजधानीत हे संमेलन होणे ही मोठी गरज होती. मराठी भाषिकांसाठी ही मोठी साहित्य पर्वणी असेल. अखेर मराठी सारस्वतांनी दिल्ली सर केली आहे. ही घटना महत्त्वाची आहे. मराठीचा दिल्लीतील संपलेला सक्षम आणि समर्थ दबावगट निर्माण व्हायला या संमेलनाने (98th Marathi Sahitya Sammelan) निश्वितच चालना मिळेल अशी अपेक्षा अनेक साहित्यिकांनी व्यक्त केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.