Akshat Kalash Yatra in Shajapur : मशिदीसमोर अक्षत कलश यात्रेवर दगडफेक, परिसरात कलम १४४ लागू

ही घटना मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील आहे. या घटनेत एक तरुण जखमी झाला आहे. या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला आणि परिसरातील लोक पोलीस स्टेशनमध्ये जमले.

320
Akshat Kalash Yatra in Shajapur : मशिदीसमोर अक्षत कलश यात्रेवर दगडफेक, परिसरात कलम १४४ लागू

जानेवारी २२ रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या अभिषेकासाठी देशभरातून (Akshat Kalash Yatra in Shajapur) अक्षत कलश यात्रा काढली जात आहे. अशातच मध्य प्रदेश मधील शाजापूर येथे अक्षत कलश यात्रेदरम्यान दगडफेकीची घटना घडली. या घटनेत एक तरुण जखमी झाला आहे. त्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्याच वेळी, हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्याला वेढा घातला आहे आणि आरोपींवर बुलडोझरने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : ‘हे’ आमदार ठरणार का अपात्र ?)

असामाजिक घटकांवर हल्ले

सोमवारी म्हणजेच ८ जानेवारी रोजी शाजापूर येथे संध्याकाळी कलश यात्रा (Akshat Kalash Yatra in Shajapur) काढण्यात आली होती. यादरम्यान काही लोकांनी ही कलश यात्रा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अचानक त्यांनी यात्रेवर दगडफेक करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Pankaja Munde यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा होणार ई-लिलाव)

कारवाई करण्याची मागणी 

या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला (Akshat Kalash Yatra in Shajapur) तात्काळ अटक करून पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

(हेही वाचा – India Alliance : वंचित चा इंडी आघाडीत समावेश ‘ही निव्वळ धूळफेक’: वंचित बहुजन आघाडी)

दगडफेक करणारा विधर्मी – आमदार अरुण भीमावत

शाजापूरचे आमदार अरुण भीमावत यांनीही कोतवाल पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना या प्रकरणात त्वरित आणि कठोर कारवाई करण्यास सांगितले. ते म्हणाले की, सोमवारी संध्याकाळी ही यात्रा निघत असताना धर्मांधांनी (Akshat Kalash Yatra in Shajapur) त्यावर दगडफेक केली, ज्यामुळे शहरात अशांतता निर्माण झाली. आम्ही पोलिसांना या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.