Agniveer : सियाचीन येथे अग्नीवीर अक्षय लक्ष्मण गावते यांना वीरमरण; लष्कराकडून मिळणार ‘इतके’ साहाय्य

जगातील सर्वांत उंच सैन्य तळ असलेल्या सियाचीन येथे तैनात भारतीय सैनिक अक्षय लक्ष्मण गावते यांना वीरमरण आले. देशासाठी प्राणार्पण करणारे ते पहिले ‘अग्नीवीर’ झाले आहेत.

87
Agniveer : सियाचीन येथे अग्नीवीर अक्षय लक्ष्मण गावते यांना वीरमरण; लष्कराकडून मिळणार 'इतके' साहाय्य
Agniveer : सियाचीन येथे अग्नीवीर अक्षय लक्ष्मण गावते यांना वीरमरण; लष्कराकडून मिळणार 'इतके' साहाय्य

जगातील सर्वांत उंच सैन्य तळ असलेल्या सियाचीन येथे तैनात भारतीय सैनिक अक्षय लक्ष्मण गावते यांना वीरमरण आले. (Agniveer) देशासाठी प्राणार्पण करणारे ते पहिले ‘अग्नीवीर’ झाले आहेत. अक्षय हे भारतीय सैन्यातील ‘फायर अँड फ्यूरी’ या विभागात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. (Agniveer)

काराकोरम पर्वतरांगेत जवळपास २० हजार फूट उंचीवर असलेल्या सियाचीन हिमनदीच्या परिसरात जगातील सर्वांत उंच सैन्य तळ आहे. येथे भारतीय सैनिकांना प्रचंड थंड वातावरणाला तोंड द्यावे लागते. जून महिन्यात आग लागण्याच्या कारणावरून येथील सैन्य तळावर एका सैनिकाचा मृत्यू झाला होता, तर ३ सैनिक घायाळ झाले होते. (Agniveer)

(हेही वाचा – IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात जेव्हा प्रेक्षक महम्मद शामीच्या नावाचा गजर करतात…)

काय आहे ‘अग्नीवीर’ योजना ?

‘अग्नीवीर’ ही भारतीय सैन्यात सैनिकांची ४ वर्षांसाठी भरती करण्यासाठीची शासनाची योजना असून यांतर्गत केवळ सैनिकांची नियुक्ती केली जाते. यात सैन्याधिकार्‍यांचा समावेश नसतो. या योजनेच्या अंतर्गत तैनात सैनिकांना ‘अग्नीवीर’ म्हटले जाते.

अक्षय लक्ष्मण गावते यांच्या कुटुंबियांना किती हानीभरपाई मिळणार ?

पहिला शहीद अग्नीवीर अक्षय लक्ष्मण गावते यांच्या कुटुंबाला १ कोटी १३ लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. लष्कराच्या लेह येथील फायर अँड फ्युरी कॉर्प्सने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘अग्निवीर अक्षय लक्ष्मण गावते यांनी सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना आपले प्राण अर्पण केले. मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदतीबाबत सोशल मीडियावर परस्परविरोधी संदेश येत असल्याने, हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे की, नातेवाइकांना मिळणारे वेतन (निधी) सैनिकाच्या सेवेच्या संबंधित अटी आणि शर्तींनुसार नियंत्रित केले जाते. (Agniveer) अग्निवीरांच्या नियुक्तीच्या अटींनुसार, हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबियांना अधिकृत अर्थसाहाय्य खालीलप्रमाणे असेल –

१. हुतात्मा लक्ष्मणच्या कुटुंबियांना योगदान विमा म्हणून ४८ लाख रुपये मिळतील.
२. मृतांच्या कुटुंबियांना ४४ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
३. अग्निवीराने दिलेल्या योगदानातून नातेवाईकांना सेवा निधीतून (३० टक्के) रक्कम देखील मिळेल, ज्यात सरकारचे समान योगदान आणि व्याज देखील समाविष्ट असेल.
४. कुटुंबाला मृत्यूच्या तारखेपासून चार वर्षे पूर्ण होईपर्यंत उर्वरित कार्यकाळासाठी देखील पैसे मिळतील आणि ही रक्कम १३ लाखांपेक्षा जास्त असेल.
५. याशिवाय, शहीद जवानांच्या कुटुंबियांना सशस्त्र सेना युद्ध अपघात निधीतून ८ लाख रुपये दिले जातील.
६. आर्मी वाइव्ह्ज वेल्फेअर असोसिएशनकडून (एडब्ल्यूडब्ल्यूए) त्वरित ३०,००० रुपयांची आर्थिक मदत मिळेल. (Agniveer)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.