हिंदू सणात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक जण सोने-चांदी, नवीन वस्तू, घर, वाहने खरेदी करतात. तसेच अक्षय्य तृतीयानिमित्त आंब्यांची (Mango) खरेदी ही मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदा मात्र बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याचा हंगाम लवकर सुरू झाला असून तो वेळेआधी आटोपत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गृहिनींना ज्यादा दराने आंबे विकत घेऊन आमरस पुरीचा बेत करावा लागणार आहे. (Akshaya Tritiya 2024)
अक्षय्य तृतीया म्हणजे घरोघरी पुरणपोळी (Puranpoli) अन् आंब्याचा रस असा ठरलेला बेत असतो. त्यासाठी लगबगीने तयारीदेखील केली जाते. मात्र ऐन मे महिन्यातच आंब्यांची आवक घटली आहे. त्यामुळे यंदा बाजारात केळव ५० टक्केच आंबा दाखल झाला आहे. बाजारपेठात फेब्रुवारीपासून आंबे दाखल होण्यास सुरुवात होते. त्यानंतर मार्च, एप्रिल व मे हे कोकणातील हापूस आंब्यांचा (Haapus Mango) मुख्य हंगाम असतो. (Akshaya Tritiya 2024)
(हेही वाचा – PM Narendra Modi: “काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा…” ; पंतप्रधान मोदींची शरद पवारांना खुली ऑफर)
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आठवडाभर बाजारात मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक होत असते. मात्र यावेळी बाजारात नेहमीच्या तुलनेने आवक निम्म्यावर आली आहे. तसेच बदलत्या हवामानामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस आणि एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक बाजारात झाली. यावेळी रत्नागिरीमधून आंब्यांची आवक कमी झाली असं व्यापाऱ्यांचे मत आहे. (Akshaya Tritiya 2024)
(हेही वाचा – Dabholkar murder case प्रकरणी संजीव पुनाळेकर, वीरेंद्र तावडे, विक्रम भावे निर्दोष; शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोषी)
अक्षय्य तृतीयेच्या दरम्यान हापूस आंबा अगदी २०० ते ३०० रुपये डझनापर्यंत बाजारपेठेत उपलब्ध होतो. त्यामुळे अनेकांच्या या आंब्यावर उड्या पडतात. याच कालावधीत अक्षय्य तृतीयाही येते. या दिवशी अनेकांच्या घरी आमरस पुरीचा (Aamras Puri) बेत असतो. मात्र या वर्षी याच कालावधीत आंब्याची आवक कमी झाली आहे. (Akshaya Tritiya 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community