संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रा सोहळा मंगळवारी पासून सुरु होत आहे. शनिवार कार्तिकी एकादशी तर सोमवार संजीवन समाधी सोहळा आहे. अशातच आळंदी देवस्थानच्या विश्वस्त समितीची निवड करताना ग्रामस्थांना डावलल्याच्या निषेधार्थ आळंदीत मंगळवारी (५ डिसेंबर) दळणवळण आणि व्यापार बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच आळंदीतील प्रदक्षिणा मार्गाने निषेध मोर्चा काढून महाद्वार सभेचे आयोजन केले आहे. या बाबतचे निवेदन ग्रामस्थांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक रवींद्र पाटील यांना दिले. (Alandi)
आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांची निवड करण्यात यावी यासाठी संबंधित प्रशासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला होता. तरी देखील संबंधित प्रशासनाने स्थानिकांचा विचार न करता आळंदी देवस्थानवर तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशी वर नवीन तीन विश्वस्तांची नेमणुक केली आहे. तसेच तत्कालीन विश्वस्तांना सुध्दा मार्च महिन्यापर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. याबाबत समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने या गोष्टीचा तीव्र निषेध करण्यात आला असून प्रशासनाने याकडे योग्य लक्ष न दिल्यास कार्तिकी वारीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आळंदी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी बहुसंख्येने आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते. (Alandi)
(हेही वाचा : Mizoram Assembly Election 2023 : मिझोराम मध्ये मतमोजणीला सुरुवात)
काय आहे ग्रामस्थांचे म्हणणे..
आत्तापर्यंत आळंदीबाहेरील विश्वस्त असल्याने भाविकांच्या व्यवस्थापनाबाबत कोणतेच प्रश्न सोडविले नाहीत. स्थानिक प्रशासन आणि आळंदी देवस्थान यांच्यातच सुसंवाद नसल्याने नेहमीच गैरसोय आणि अनुचित प्रकार घडतात. अनेकदा नेमलेल्या विश्वस्तांची गैरहजेरी असते. दर्शनमंडप जागेचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून सोडवता आला नाही. संस्थानच्या नावे गायरान जागेत विकासकामे केली नाहीत.
अन्य देवस्थाने वेगाने विकास करत आहेत. मात्र सातशे वर्षांपासूनचे देवस्थान विकास आणि सोयी-सुविधांबाबत मागास असल्याचे चित्र आहे. यामुळे स्थानिक आळंदीकरांची नेमणूक होणे अपेक्षित आहे. देवस्थानच्या कारभाराबाबत तक्रारी करूनही उत्तरे दिली जात नाहीत. जिल्हा न्यायालयांना वेळ मागूनही भेटीसाठी वेळ दिला नाही. नव्याने नेमणूक केलेल्या तीन विश्वस्तांबाबतचा २० नोव्हेंबरचा आदेश रद्द करावा अशी मागणी आहे. त्यामुळे निषेध सभा आणि बंद करण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community