अलास्का एअरलाइन्सच्या बोईंग कंपनी 737 मॅक्स या विमानाचे पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सोशल मेसेजिंग साइट एक्सने पोस्ट केलेली छायाचित्रे आणि व्हिडिओमध्ये विमानाच्या खिडकीच्या काचा फुटल्या त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर या विमानाचे अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये शुक्रवारी(५ डिसेंबर) इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या घटनेत कोणी जखमी झाले की नाही हे स्पष्ट झालेले नाही. पण विमान कंपनीने सांगितले की ते या घटनेची ते चौकशी करत आहेत. (Alaska Airlines)
अलास्का एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार विमान १२८२ मध्ये १७१ प्रवासी आणि सहा कर्मचारी पोर्टलंडहून कॅलिफोर्नियातील ओंटोरियोला जात होते. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेनंतर लगेचच, अलास्का एअरलाइन्स आणि बोईंग एअरप्लेन्स या दोघांनीही सांगितले की ते प्रवाशांच्या संपर्कात आहेत. त्यांनतर पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व जण सुरक्षितपणे परत आले. काय घडले याचा आम्ही तपास करत आहोत असे विमान कंपनीने एक्स प्लॅटफॉर्मवर सांगितले.
(हेही वाचा : Pavngadh : पावनगडावरील अनधिकृत मदरसे हटविले ; तब्बल सात तास सुरु होती कारवाई)
हे विमान अगदी नवीन बोईंग 737 मॅक्स 9 होते, जे ऑक्टोबरमध्ये अलास्का एअरलाइन्सला देण्यात आले होते. मात्र हे कसे घडले याची माहिती गोळा करत आहोत असेही त्यांनी सांगितले. बोईंगची तांत्रिक टीम याचा तपास करेल”.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community