नालासोपा-यात अवैध विक्रीतून ‘तो’ दुर्मिळ अजगर वाचला आणि नंतर…

147

गेल्या आठवड्यात नालासोपारा येथे वनविभागाने कारवाई केलेल्या प्राण्यांच्या अवैध विक्रीतील अल्बिनो अजगर आणि स्टार प्रजातीच्या कासवाला उपचारांसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला शनिवारी वनाधिका-यांनी दाखल केले. त्यापैकी बर्मिस अल्बिनो अजगराला कदाचित कायमस्वरुपी उद्यानात ठेवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या अजगराला स्वतःहून शिकार करता येत नाही, तसेच त्याच्या हालचालीही मर्यादित असल्याने हा अजगर जन्मापासूनच पाळीव असल्याची दाट शक्यता वनाधिका-यांनी व्यक्त केली.

बर्मिस अजगर हा प्रामुख्याने पूर्व आशियात आढळतो. भारतात हा दुर्मिळतेने आढळतो. जंगलात राहणा-या या बर्मिस अजगरात अल्बिनो प्रकार हा अभावतेने दिसतो. रक्तातच मिलन घडल्याने प्राण्यांमध्ये कमी रंगछटांच्या तसेच शारिरीक रचनांमध्ये अपवादात्मक प्रकाराचे प्राणी जन्म घेतात. हा प्रकार सरपटणा-या प्राण्यांमध्येही दिसतो. दुर्मिळ अल्बिनो प्रकाराच्या प्राण्यांना अवैध प्राण्यांच्या विक्रीत जास्त मागणी असते. त्यामुळे अगोदरच भारतात दुर्मिळ असलेल्या बर्मिस अजगराला हेतुपरस्पर अल्बिनो बनवण्यासाठी अल्बिनो बर्मिस तसेच सामान्य अजगराचे मिलन घडवून त्यातून जन्मलेल्या पिल्लाला पाळले गेल्याची शंका वनाधिका-यांनी व्यक्त केली. हा अजगर भारतात जन्मला की भारताबाहेर, याबाबत वनाधिका-यांना अद्यापही माहिती मिळालेली नाही.

( हेही वाचा: कसा-यात बिबट्याला पकडले )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.