करण जोहरच्या पार्टीत अभिनेत्री आलिया भट्ट सहभागी झाली होती. या पार्टीत करिना, करिष्मा कपूरसह चार जणांना कोरोनाची लागण झाली. म्हणून मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने आलिया हिला सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला, परंतू ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी पोस्टर प्रदर्शित होण्यापूर्वी आलियाने दिल्लीतील गुरुद्वारला भेट दिली. त्यामुळे होम क्वारंटाईनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काय म्हणाल्या राजुल पटेल?
मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीने आलिया भट्टविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. आलिया भट्ट नियमांचे उल्लंघन करत दिल्लीला गेली. दिल्लीतील फोटोदेखील तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे आलियाला आता धडा शिकवण्याची गरज आहे. आलिया सेलिब्रिटी आहे, तिचे अनुकरण करणारे अनेक जण आहेत, अशा वेळी एक जबाबदार नागरिक म्हणून आलियाने नियमांचे उल्लंघन करू नये, असे आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल म्हणाल्या.
(हेही वाचा ‘लालपरी’च्या सेवेतून ११ कर्मचारी बडतर्फ, २५७ जणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस)
तरी आलिया दिल्लीत गेली
बुधवारी रात्री आलिया भट्ट चार्टड विमानाने मुंबईत दाखल झाली. आलिया हाय रिस्क रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे तिला सात दिवस होम क्वारंटाईन रहाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर मात्र पाच दिवसांतच आलिया दिल्लीत पोहोचली. आलियाने एका दिवसाच्या कामाकरता होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केले. दरम्यान आपण एका दिवसाच्या कामाकरता दिल्लीला जात असून आपला कोविड रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे आलियाने पालिकेला कळवले होते.
कोणते सेलिब्रिटी कोरोनाबाधित?
अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खानलादेखील कोरोनाची लागण झाली. त्यानंतर सलमान खानचा भाऊ अभिनेता सोहेल खानचा मुलगा योहान खानलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरनंतर आता त्यांची मुलगी शनाया कपूरलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. शनायाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community