निसर्गरम्य अलिबागला जाता येणार फक्त सव्वा तासात! प्रवाशांना मिळतील भन्नाट सुविधा; किती असणार भाडे?

निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई आणि मुंबई महानगराशी जोडण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. नवी मुंबईकरांसाठी वॉटर टॅक्सीची नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे नवी मुंबईकरांना अलिबागला फक्त सव्वा तासात पोहोचता येणार आहे. येत्या शनिवारपासून या सेवेला सुरूवात होणार आहे. या वॉटर टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तिकिटासाठी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागणार आहेत.

( हेही वाचा : कोकण रेल्वे करणार ‘एवढ्या’ कोटींची बचत, होईल सुपरफास्ट प्रवास! जाणून घ्या विद्युतीकरणाचा फायदा)

वॉटर टॅक्सीचे वेळापत्रक

बेलापूर ते मांडवा असा हा मार्ग असून शनिवार २६ नोव्हेंबरपासून या मार्गावर वॉटर टॅक्सी धावणार आहे. बेलापूर जेट्टी येथून सकाळी ८ वाजता ही वॉटर टॅक्सी निघणार असून सकाळी ९.१५ वाजता मांडव्याला पोहोचेल. तर संध्याकाळी ६ वाजता मांडव्यावरून वॉटर टॅक्सी निघेल आणि रात्री ७.४५ ला बेलापूरला पोहोचेल. ही वॉटर टॅक्सी केवळ शनिवारी-रविवारी या सुट्टीच्या दिवशीच धावणार आहे. यासाठी ३०० ते ४०० रुपये तिकीट असणार आहे. यामुळे बेलापूर ते मांडवा हे अंतर केवळ सव्वातासात पार करता येणार आहे. या सेवेसाठी ऑनलाईन बुकिंग बुधवारपासून सुरू होणार आहे.

दरम्यान, १ नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सुरू झालेली आहे. वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य झालेले आहे. दिवसाला ६ फेऱ्या चालवल्या जातात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here