ओशिवरा प्रसूतिगृहात अत्याधुनिक सुविधा; पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन

मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागातील ओशिवरा गांव परिसरात असणा-या भूखंडावर १५२ खाटांच्या प्रसूतिगृहाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी, १९ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. या प्रसूतिगृहात प्रसूतिकक्ष, प्रसूति-पूर्व व प्रसूति-पश्चात कक्ष, स्त्रीरोग व कुटुंबकल्याण विभाग, कर्करोग तपासणी व उपचार विभाग, आयसीयू, एनआयसीयू, शस्त्रक्रियागृह आदी सुविधा असणार आहेत. त्याचबरोबर मूल नसलेल्या जोडप्यांसाठी अत्याधुनिक तपासणी व उपचारांची सुविधा असणारे आयव्हीएफ क्लिनिक, ब्लड बँक, मेडिकल वॉर्ड, एनआयसीयू, एमआयसीयू, मिल्कबँक इत्यादी सुविधाही असणार आहेत.

असे असणार प्रसूतीगृह!

या प्रसूतिगृहामुळे अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम विभागातील आनंद नगर, मिल्लत नगर, बेहराम बाग, राममंदिर मार्ग व भगतसिंह नगर आदी परिसरातील साधारणपणे ३ ते ३.५ लाख लोकसंख्येला सर्वोपचार वैद्यकीय सेवेसह अतिविशेष सेवा उपलब्ध होणार आहेत. ओशिवरा गाव येथील ओशिवरा प्रसूतीगृहाचे बांधकाम हे  १३,५०५.१५ चौरस मीटर क्षेत्रफळावर होणार आहे. हे प्रसूतिगृह तळघर, तळमजला आणि त्यावरील ११ मजले यानुसार एकूण १३ मजल्यांचे असणार आहे. यापैकी १० व ११ वा मजला हा कर्मचा-यांच्या निवासस्थानासाठी असणार आहे. तसेच या प्रसूतिगृह परिसरात पुरेशा संख्येने वाहने उभी राहतील असे वाहनतळही असणार आहे. या प्रसूतिगृहात प्रसूतिकक्ष, प्रसूति-पूर्व व प्रसूति-पश्चात कक्ष, स्त्रीरोग व कुटुंबकल्याण विभाग, कर्करोग तपासणी व उपचार विभाग, आयसीयू, एनआयसीयू, शस्त्रक्रियागृह आदी सुविधा असणार आहेत. त्याचबरोबर मूल नसलेल्या जोडप्यांसाठी अत्याधुनिक तपासणी व उपचारांची सुविधा असणारे आयव्हीएफ क्लिनिक, ब्लड बँक, मेडिकल वॉर्ड, एनआयसीयू, एमआयसीयू, मिल्कबँक इत्यादी सुविधा देखील असणार आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय निदानासाठी रक्त तपासणी सुविधा, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, अल्ट्रासाऊंड, डायलिसिस या सुविधाही या प्रसूतिगृहात असणार आहेत.

(हेही वाचा भारतीय कुस्तीतही #MeToo; ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटू उतरल्या ‘मैदानात’)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here