कोयना धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आले आहेत. २ हजार १०० क्यूसेस वेगाने धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. जर पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर असाच वाढत राहिला, तर धरणाचे दरवाजे आणखी वर उचलावे लागतील. त्यामुळे कोयना धरणातून वाहणाऱ्या पाण्याचा आजूबाजूच्या गावातील रहिवाशांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तर धरणाचे दरवाजे आणखी वर उचलावे लागणार
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढत चालला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे धरण ओळखले जाणारे कोयना धरण केव्हाही भरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काळजीच्या हेतूने धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. ८० टीएमसी पाणीसाठा कोयनेत जमा झालेला आहे. धरणातील वाढलेला पाणीसाठा पाहता प्रशासनाने तातडीने धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोयनेच्या प्रवाहाच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच सुरु राहिला तर दरवाजे आणखी वर उचलले जाण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा आता महिला वैमानिक करतायेत सागरी सीमांचे रक्षण, पहिली महाराष्ट्राची नौदल वैमानिक अपूर्वा गितेंचा समावेश)
सांगली, चिपळूणकरांसाठी धोक्याची घंटा
एकीकडे अलमट्टी धरणातून २ लाख क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीतील कृष्णा नदीची पातळी काहीशी स्थिर झाली आहे. मात्र त्याच वेळी कोयना नदीच्या पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे सांगलीकरांच्या अडचणीत वाढ होणार आहे. तसेच कोयनेचे पाणी खाली चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत सोडले जाते, त्यामुळे चिपळूणकरांनाही पुराचा धोका निर्माण होणार आहे.
Join Our WhatsApp Community